सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोनेसांगवी
डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त लाइफ सक्सेस फाउंडेशनच्यावतीने सोनेसांगवी येथे गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये गावातील तसेच परिसरातील 75 गरजू नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 13 वर्षांपासून सामाजिक उपक्रमाची परंपरा यंदाच्या वर्षीही सुरू ठेवण्यात आली.
डॉ. दत्ता तपसे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 13 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता तो समाजातील गरजू घटकांसाठी उपयोगी ठरावा, या उद्देशाने दरवर्षी आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू रुग्णांनी घेतला. डोळ्यांच्या विविध समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी डॉ. अविनाश अघोर यांनी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. या स्तुत्य उपक्रमामुळे डॉ. तपसे यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व लाभार्थी रुग्णांनी लाइफ सक्सेस फाउंडेशन आणि डॉ. दत्ता तपसे यांचे आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. सचिन तपसे, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक तेजस कानडे, शिवाजी इखे, राहुल केंद्रे, नितीन बचूटे, आश्रुबा वाघमारे, अफसर शेख, बाळकृष्ण तपसे, विशाल नाईकवाडे तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.
यावेळी डॉ. दत्ता तपसे यांनी “वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस न राहता समाजसेवेचा दिवस व्हावा,” या भावनेतून मागील 13 वर्षांपासून असे अनेक उपक्रम सातत्याने सुरू असल्याची भावना व्यक्त केली.
हे ही वाचा मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे




