सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
राजकीय गुंडांना खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव आणि त्रास दिला जात आहे. उलट खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले नसल्याने चौकशी समिती नेमली. या सर्व जाचाल कंटाळून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी न्यायासाठी 18 ऑगष्ट 2026 रोजी आत्महत्येचा व्हिडीओव्दारे इशारा दिला होता. परंतु न्याय न मिळाल्याने पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि फलटण उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. लीना मदने यांच्या त्रासाला कंटाळून डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी मुंबईतील सायनच्या हाय व्हॉल्टेल टॉवरवरती चडून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले. परंतु या प्रकरणामुळे ॲन्टी करप्शनची रेड, फलटणमधील खंडणी प्रकरणानंतर डॉ. भगवान पवार आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
घडलेली घटना अशी की, गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सायन रेल्वे स्थानक परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर एक व्यक्ती चढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि खाली येण्याचे आवाहन केले. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्या व्यक्तीने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत त्यांना सुरक्षितपणे खाली आणले. यामध्ये संबंधीत व्यक्ती फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉ. राजेंद्र रूपनवर असल्याचे निष्पण झाले. त्यावेळी डॉ. राजेंद्र रुपनवर यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच बचाव पथकातील जवानांनी तातडीने प्राथमिक वैद्यकीय मदत करत CPR देऊन त्यांची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागील नेमकी कारणे, नोकरीवरील कारवाईची पार्श्वभूमी आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न का केला ? याबाबत मुंबई पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
हे ही वाचा डॉ. भगवान पवारांची 14 वर्षे पुणे सर्कलमध्ये फुगडी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी यापूर्वी दोनवेळा आत्महत्येचा इशारा आणि पत्रे देऊनही प्रशासन ठप्प होते. चौकशी समितीचा अहवाल अजून आला नाही, असा आरोप करीत वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी गुरुवारी, 27 ऑगष्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन परिसरात हाय व्होल्टेज टॉवरवर चढून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कारभार पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे.
एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहायकाने शस्त्र परवान्यासाठी दबाव टाकून त्रास दिल्याप्रकरणी डॉ. रुपनवर यांनी 29 ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचे पत्र आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी फलटण येथील पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून समजूत घातली होती. दरम्यान, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. वरिष्ठांच्या सूचनेनुसार समितीने त्यांचीही चौकशी केली. मात्र, महिना उलटून गेला तरी त्याचा अहवाल आला नसल्याचा आरोप करीत त्यांनी पुन्हा 18 ऑगस्ट रोजी आत्महत्येचा इशारा दिला होता. अशातच गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुंबईतील सायनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने आणि पुणे सर्कलचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते कामात हस्तक्षेप करतात. प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केला जातो. फिटनेस प्रमाणपत्राची मागणी करणारे प्रसाद कोंडे आणि डॉ. पवार यांचे जवळचे संबंध असल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोपही त्यांनी केला व्हिडीओच्या माध्यमातून केला होता.
हे ही वाचा “भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे”
DHO डॉ. कोपरुवाड यांच्याकडून पुरूष अधिकाऱ्यांना कोपरखळ्या, महिला अधिकाऱ्यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर
सेवा शुल्काच्या आडून शासनाची 3 वर्षात 24 कोटींहून अधिकची होणार नाहक लुट




