सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सध्या सार्वजनिक आरोग्य विभागामधील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, उपसंचालक आदी महत्त्वांच्या पदांवर जेष्ठता डावलून नियुक्त्या दिल्या आहेत. परंतु डॉ. भगवान पवार हे DD पदाच्या जेष्ठता यादीत आणि DD केडर मध्येही नाहीत. तरी त्यांना उपसंचालक पदी (पदावनत करून) नियुक्ती दिली आहे. ही खुप गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे “DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा” अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागातून होत आहे. तरी कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. भगवान पवार यांची निलंबनाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत, सध्या DD केडर मध्ये नसल्याने त्यांना त्या पदावरून हटवून DHO किंवा MOH करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 16/12/2025 रोजी दुपारी 1 वाजता वर्षा निवास्थान, मुंबई येथे झाली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध आस्थापनांच्या कार्यालय प्रमुख पदांवरील नेमणुका जेष्ठता डावलून केल्या जात आहेत. तरी जेष्ठता यादीनुसार नियुक्त्या द्याव्यात, अशा लेखी सुचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या होत्या. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सुचनांचा आदर करून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. भगवान पवार यांना उपसंचालक पदावरून हटवणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या ठिकाणी DD केडर मधील जेष्ठता यादीनुसार किंवा दोन वर्षांपूर्वी MPSC मार्फत DD पदासाठी पात्र झालेल्यांना नियुक्ती देणे योग्य ठरणार आहे.
डॉ. बबिता कमलापुरकर किंवा डॉ. राधाकिशन पवारांना उपसंचालक पद द्यावे…
पुणे सर्कल उपसंचालक पदी DD केडर मधील जेष्ठता यादीतील पात्र उमेदवारांना किंवा दोन वर्षांपूर्वी MPSC मार्फत DD पदासाठी पात्र झालेल्या डॉ. बबिता कमलापुरकर किंवा डॉ. राधाकिशन पवार यांना उपसंचालक पद द्यावे, अशी चर्चा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे सर्कल मध्ये सुरू आहे.
हे ही वाचा ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू
आरोग्य मंत्र्यांकडून डॉ. भगवान पवारांच्या निलंबनाचे संकेत
पुणे उपसंचालकपदी डॉ. राधाकिशन पवार यांची नेमणुक करा
क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा




