सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
सार्वजनिक आरोग्य विभागातील पुणे सर्कलमध्ये सध्या “हम करेसो कायदा” अशी परिस्थिती आहे. येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाच्या नावाखाली दबाव टाकणे, वारंवार छोट्या-छोट्या गोष्टींवरून नोटीस काढून कारवाई-निलंबनाच्या धमक्या देणे, स्वतःच्या नावाची दहशत माजवणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम कमी आणि मिटींग, बैठका, व्हीसी मध्ये दिवसरात्र गुंतवणे, रात्री 9 ला व्हीसी सुरू करून 11 पर्यंत अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर महिलांनाही वेटीस धरणे, रात्रीच्या व्हीसी मध्ये वारंवार “कॅमेरा ऑन करा, तुम्ही दिसत नाही, कॅमेरा ऑन करा”च्या सुचना वारंवार देणे, प्रत्येक गोष्टीत “मला आरोग्य मंत्री साहेबांचा आदेश आहे” म्हणत मंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून दहशत पसरवणे, आपण आरोग्य मंत्री महोदयांच्या किती जवळ आहे, हे भासवणे, असे प्रकार गेल्या 6-7 महिन्यांपासून अविरत सुरू आहेत. त्यामुळे “भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे” असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
सार्वजनिक आरोग्य विभागात प्रधान सचिव, आयुक्त, संचालक आणि इतर 7 सर्कलच्या उपसंचालक या सर्वांपेक्षा मीच सर्वात जास्त काम करत असल्याचा msg आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला. मात्र कागदोपत्री पुणे सर्कल टॉपच्या दिशेने असले तरी वस्तुस्थिती काय आहे ? हे याच सर्कलमधील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आरोग्य मंत्री साहेबांनी जाणून घ्यावे. सत्य समोर येईल. पुणे सर्कलमधील अधिकारी-कर्मचारी कामापेक्षा जास्त मानसिक त्रासाला कंटाळले आहेत. देण्यात येणाऱ्या नोटीसांमुळे परेशान आहेत. बरं, काढलेल्या नोटीसांचे खुलासे अमान्य केल्यानंतर अद्यापपर्यंत एकावरही कारवाई केली गेली नाही. कारवाई ऐवजी पुढे काय केले जाते ? हे सर्वांना माहित झाले आहे. दहशत पसरवून सर्वांना दबावाखाली काम करण्यास भाग पाडणे आणि स्वतःच्या नावाखी दहशत पसरवणे, यातच आत्मीक समाधान मानणाऱ्या अधिकाऱ्याला आरोग्य मंत्र्यांनी योग्य ती जागा दाखवण्याची मागणी वाढत चालली आहे.
रात्रीस खेळ चाले…
पुणे सर्कलमध्ये मध्यरात्री प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालयांना भेटी. पण अद्यापर्यंत बदल तो काय झाला ? दुसरीकडे नाईट स्क्वॉड पथकांची नेमणुक, परंतु या पथकाकडून कुठे भेटी देण्यात आल्या ? त्यामुळे नाईट स्क्वॉड पथकच झोपी गेल्याचे दिसुन येते. रात्री 9 ते 11 पर्यंत व्हीसी. उपसंचालक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयात वेटीस धरणे. त्यामुळे पुणे सर्कलमध्ये “रात्रीस खेळ चाले…” हा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय सध्या सुरू आहे. या सर्व गंभीर प्रकारावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून रामबाण उपाय नक्की केला जाणार असल्याची चर्चा मात्र पुणे सर्कल बरोबरच सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.
हे ही वाचा क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा
तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
ACB प्रकरणात डॉ. भगवान पवारांना अटक अन् बडतर्फच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू




