सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर अंतर्गत सध्या औषध निर्माण अधिकारी पदी कार्यरत लीना पुजारी यांच्या नियमबाह्य पध्दतीने केलेल्या नियुक्तीची चर्चा जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाभर रंगली आहे. या पदासाठी ना त्यांना आवश्यक अनुभव आहे, ना ही बदलीस पात्र आहेत आणि ना ही जेष्ठता यादीनुसार पात्र आहेत. तसेच पुजारी यांची बदली प्राथमिक आरोग्य केंद्र, वळसंग येथून प्राथमिक आरोग्य केंद्र, अनगर येथे ऑगस्ट 2025 मध्ये झाली होती. त्यानंतर 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या बदलीस पात्र होत्या. परंतु अवघ्या 5 महिन्यात त्यांची नियुक्ती जिल्हा औषध भांडार येथील औषध निर्माण अधिकारी पदी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या नियमबाह्य पध्दतीने केलेल्या नियुक्तीच्या संदर्भातील कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तपासल्यास नियुक्तीमधील गैरप्रकार उघड होईल तसेच वरिष्ठांची कागदोपत्री केलेली दिशाभुलही लक्षात येणार आहे.
हे ही वाचा “भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे”
या नियुक्ती प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले आहे. एखदा बदली झाल्यानंतर साधारणपणे 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच लीना पुजारी यांची इतरत्र आवश्यक त्या ठिकाणी किंवा इच्छुक ठिकाणी बदली करणे पात्र ठरणार होते. परंतु 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याओगादरच बदली करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी कोण-कोणती कागदपत्रे जोडली आहेत ? अनुभव प्रमाणपत्र कोणत्या आधारावर जोडले आहे ? बदली पात्र धोरणास त्या पात्र आहेत का ? याची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच लीना पुजारी यांच्या ठिकाणी औषध निर्माण अधिकारीपदी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. जेणेकरून जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हेळसांड न होता त्यांना आवश्यक औषधे, उपकरणे, यंत्रसामग्री वेळोवेळी मागवली जातील. जिल्हा परिषद सेस फंड, DPDC चा निधी, NRHM मधील निधीचा योग्य वापर होईल. त्यामुळे या गैरप्रकाराकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
CEO यांनी औषध पुरवठाधारकांचे इन-कॅमेरा जबाब नोंदवावे, सत्य समोर येईल…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जि. प. आरोग्य विभागातील मार्च 2026 अखेर पर्यंत ज्या-ज्या औधष पुरवठाधारकांची बिले अदा केली आहेत. त्या सर्व औषध पुरवठाधारकांचे जबाब इन-कॅमेरा नोंदवावे, त्यांना गेलेले कॉल तपासावेत, औषध निर्माण अधिकारी यांनी कशासाठी कॉल केले होते ? या सर्वांचे रेकॉर्डींग औषध पुरवठाधारांकडे उपलब्ध असल्याची माहिती संबंधीत अनेक औषध पुरवठाधारकांनी “सत्ताकारण”ला दिली आहे. त्यामुळे CEO यांनी औषध पुरवठाधारकांचे इन-कॅमेरा जबाब नोंदवावे, सत्य समोर येईल…
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
डॉ. भगवान पवारांची 14 वर्षे पुणे सर्कलमध्ये फुगडी
टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा : उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार




