सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
आरोग्य विषयक जनजागृतीच्या नावाखाली मराठी वृत्तपत्रे आणि न्युज चॅनेलच्या माध्यमातुन अनेक जाहिराती प्रसिध्द केल्या गेल्या. परंतु यासाठी प्रशासकीय मान्यता नसताना प्रत्येक वृत्तपत्र आणि चॅनलला दरवर्षी कोट्यावधी रूपयांची बिले अदा केली गेली आहेत. IEC ब्युरो उपसंचालकांकडून आणि तेथील संबंधीत अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि पैशांची उधळपट्टी झाली असुन “उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे कार्यालयात” हा गैरकारभार गेली कित्येक वर्षे सुरू आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी लेखी तक्रार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही IEC चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडे
शरत शेट्टी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 ते 2025-26 या कालावधीत खाजगी न्युज चॅनेल तसेच राज्यस्तरीय अ वर्ग असलेल्या मराठी वृत्तपत्रात आरोग्य विषयक जनजागृतीपर जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत. परिणामी प्रसिध्द केलेल्या जाहिरातींची देयके प्रशासकीय मान्यता घेतली नसताना अदा केलेली आहेत. शासनाची प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक असताना संबंधीत कार्यालयातील तत्कालीन उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सध्या कार्यरत उपसंचालक डॉ. भगवान पवार, सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, कार्यालयीन अधिक्षक वंदना सवाने, सांख्यिकी पर्यवेक्षक एच. टी. कोळी, आरोग्य शिक्षण अधिकारी प्रशांत तुपकरी, प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी आदींचा समावेश असुन या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी लेखी तक्रार शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 25 नोव्हेंबर 2026 रोजी केली आहे.
आरोग्य विभागातील “मनुष्यबळ पुरवठा निविदा प्रक्रीये”च्या विरोधात अनिता एंटरप्रायजेस हायकोर्टात




