New year | नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
Source : Google
येत्या काही दिवसांतच नवीन वर्षाची सुरूवात होईल. 2024 हे नवीन वर्ष सुरू व्हायला आता जेमतेम काहीच दिवस उरलेत. नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन येत असतं.
Source : Google
नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प ठरवतात. अशा परिस्थितीत आज अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊ, ज्या तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील.
Source : Google
येत्या वर्षभरात तुम्हालाही निरोगी राहण्यासाठी तुमच्या काही सवयी बदलायच्या असतील, तर हे नक्की वाचा. चला जाणून घेऊया कोणत्या सवयी बदलून तुम्ही निरोगी राहू शकता.
Source : Google
वेळेवर झोपणे : आजकाल लोकांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा पूर्णपणे बदलल्या आहेत. बरेच लोकं रात्री उशिरा जेवतात आणि झोपायला बराच उशीर होतो.
Source : Google
अशा स्थितीत हे देखील आजारांचे मोठे कारण बनू शकते. त्यामुळे सर्वप्रथम सर्व कामे वेळेवर करण्याची सवय लावा. लवकर जेवा आणि लवकर झोपा. कमीत कमी 8 तासांची झोप घ्या.
Source : Google
स्ट्रेस मॅनेज करा : आजच्या काळात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतित किंवा स्ट्रेसमध्ये असतो. पण काही लोकांना जास्तच काळजी करण्याची सवय असते.
Source : Google
त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस् निर्माण होऊ शकतात. म्हणून, तुमचा स्ट्रेस व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही ध्यान आणि माइंडफुलनेस यासारख्या स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.
Source : Google
व्यायाम करणे फायदेशीर : शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याची सवय लावावी. यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम, योग किंवा डान्स क्लास यासारखे उपक्रम करू शकता.
Source : Google
वाचन करणे : वाचन हा सगळ्यात उत्तम छंद आहे. दिवसातला काही वेळ चांगलं काही वाचण्यात घालवावा. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
Source : Google
यासोबतच तुमचे विचार आणि तुमचे पुढील दिवसाचे वेळापत्रक डायरीत लिहीण्याची सवय लावावी. या चांगल्या सवयींमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.