सोलापूर : प्रतिनिधी
जि. प. आरोग्य विभागात जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदावर MPSC मार्फत धनंजय वाळा या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दिड महिन्यापूर्वी ते रूजूही झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे IEC चे कामकाज देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचा सोयीस्कर कारभार आणि सीईओ मनिषा आव्हाळे यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नसलेला धाक म्हणजे MPSC मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्याऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्याकडे IEC चे कामकाज देण्यात आले आहे.
हे ही वाचा “नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या-त्या पदाचे कामकाज त्याच अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकार आहे. मात्र याला जि. प. आरोग्य विभाग अपवाद आहे. येथे चक्क MPSC मार्फत हजर झालेल्या अधिकाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज पाहणे पसंत केले जात आहे. यावर नवनियुक्त जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय वाळा यांनीही सदरचा प्रकार IEC ब्युरो पुणे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांना कळवला नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून नेहमीच वरिष्ठांच्या आदेशाला, नियम-अटींना केराची टोपली आणि स्वतःसाठी सोयीस्कर कामकाज करण्याची कार्यपध्दती राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे “अर्थ” नसताना सोयीस्कररित्या कंत्राटी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC चे कामकाज सोपविले आहे. यापूर्वीही त्यांच्याकडूनच औषध खरेदीच्या फाईलींचे कामकाज करून घेतले आहे. वास्तविक पाहता NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या 3 मार्च 2023 च्या लेखी पत्रानुसार NHM मधील एखाद्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे इतर पदभार/कामकाज सोपवताना वरिष्ठांची/वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC खरेदी, वाटप आणि अन्य प्रक्रीयेच्या फायली हाताळण्याचे कामकाज वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय दिले आहे. त्यांच्याकडून NHM आयुक्त धीरज कुमार यांच्याकडूनच नाही तर NHM अध्यक्षा तथा सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडूनही परवानगी घेतली जात नाही. दुसरीकडे कंत्राटी कर्मचारीही सीईओ मनिषा आव्हाळे यांना न घाबरता डॉ. संतोष नवले यांच्या मर्जीनुसार, नियमांना डावलून कामकाज करताना दिसून येत आहेत. परिणामी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि NHM मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सीईओ मनिषा आव्हाळे यांचाही धाक नसल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा वरिष्ठांचा आदेश डावलून सांख्यिकी व्यतिरिक्त गैरप्रकारे इतर कामकाज पाहणाऱ्या काकडेंना बडतर्फ करा
दुसरीकडे आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांनी त्यांच्या जॉबचार्ट नुसार “जन आरोग्य समिती”चे कामकाज पाहणे गरजेचे आहे. मात्र नामदे यांच्याकडूनही मुळ कामकाज बाजूला ठेऊन बेकायदेशीरपणे औषध खरेदीच्या फायली हाताळणे, IEC मधील खरेदी प्रक्रीया, वाटप आणि अन्य कामकाज गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परिणामी जन आरोग्य समितीचे कामकाज जवळपास ठप्प आहे. निधी असूनही तो खर्च होत नसल्याचे चित्र आहे.
गैरकारभारावर सर्वांचे मौन
जि. प. आरोग्य विभागातील या प्रकाराबाबत सीईओ तथा NHM अध्यक्ष मनिषा आव्हाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कंत्राटी आरकेएस कोऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांना प्रतिक्रीया विचारली असता यावर कोणीही प्रतिक्रीया दिली नाही. या गैरकारभारावर सर्वांचे मौन दिसून आले.
उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांच्या भूमीकडे लक्ष
IEC खरेदीतील मलिदा सर्वांना प्रिय आहे. या पदावर सोयीस्कर कामकाज सुरू आहे. यापूर्वीही बोगस जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या आरोग्य सेवकालाही आता परत या पदाचा हव्यास आहे. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी म्हणून मीच या पदावर बसणार, अशी स्वतःच स्वतःची सर्वत्र चर्चा या आरोग्य सेवकाने घडवून आणली. परंतु MPSC मार्फत जाहीर केलेल्या यादीत यांचे नाव कुठेच दिसले नाही. तर त्या ऐवजी धनंजय वाळा यांची नियुक्ती झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा वाळा यांना हटवून मर्जीतील अधिकाऱ्याला बसवायचे आणि त्याआडून IEC चा कारभार स्वतःच हाकायचा, यासाठी त्या आरोग्य सेवकाची धडपड सुरू आहे. इतरत्र उघड उघड एका वरिष्ठ अधिकाऱ्याला उगीच Samsung Fold 5 दिला आहे का? त्यामुळे याचे कामकाज मलाच मिळणार, अशीही वाच्यता सर्वत्र होताना दिसत आहे. परंतु यावर IEC ब्युरो पुणे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर हे काय निर्णय घेणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत
चुकीच्या आदेशान्वये डॉ. एस. पी. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात ठाण मांडून