सोलापूर : प्रतिनिधी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे एखादे कामकाज सोपवताना वरिष्ठ कार्यालयाची/वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु याला येथील जि. प. आरोग्य विभाग अपवाद आहे. ज्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना NRHM च्या अध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची परवानगी घेण्याची गरज वाटली नाही, ना ही त्यापुढे जाऊन NRHM आयुक्त धीरज कुमार यांचीही परवानगी न घेता सोयीस्कार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे जि. प. आरोग्य विभागात सध्या “नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली, अशी वस्तुस्थिती आहे.
हे ही वाचा टक्केवारीनंतर आरोग्यातील अधिकाऱ्यांनी दिली सप्लायरला ऑर्डर
RKS Co-Ordinators Job Chart
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडून नेहमीच वरिष्ठांच्या आदेशाला, नियम-अटींना केराची टोपली आणि स्वतःसाठी सोयीस्कर कामकाज अशी कार्यपध्दती राहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांनी सोयीस्कररित्या कंत्राटी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC आणि औषध खरेदीच्या फाईलींचे कामकाज सोपवले आहे. मात्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि NRHM आयुक्त धीरज कुमार यांच्या 3 मार्च 2023 च्या लेखी पत्रानुसार NRHM मधील एखाद्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे इतर पदभार/कामकाज सोपवताना वरिष्ठांची/वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांच्याकडे IEC आणि औषध खरेदीच्या फायली हाताळण्याचे कामकाज वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय दिले आहे.
हे ही वाचा निसर्गापासून दूर न जाता निसर्गास आत्मसात करा : सीईओ मनिषा आव्हाळे
वास्तविक पाहता आर. के. एस. को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांनी त्यांच्या जॉबचार्ट नुसार “जन आरोग्य समिती”चे (Public Health Committee) कामकाज पाहणे गरजेचे आहे. शासनाने पूर्वीची रूग्ण कल्याण समिती बरखास्त करून नव्याने जन आरोग्य समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आर. के. एस. को-ऑर्डीनेटर श्री. नामदे यांनी सध्याच्या सर्व रूग्ण कल्याण समिती बरखास्त करून नव्याने जन आरोग्य समित्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये येथे करणे, त्यांची नोंद धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करणे, सदरची समिती स्थापन करून तिच्यामार्फत प्राप्त झालेला निधी रूग्णांच्या कल्याणासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च करणे, त्याचे नियोजन करणे, त्यानंतर सर्व सदस्यांना नेमणूक पत्र देणे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधी रूग्णांच्या कल्याणासाठी खर्च करणे, याचा सातत्याने पाठपुरावा करणे, जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांना भेटी देणे आदी सर्व कामकाज आणि जबाबदारी आरकेएस को-ऑर्डीनेटर नामदे यांची आहे. मात्र मुळ कामकाज बाजूला ठेऊन गेल्या जवळपास वर्षभरापासून खरेदीच्या फायली हाताळण्याचे कामकाज सुरू आहे. परिणामी जन आरोग्य समितीचे कामकाज जवळपास ठप्प आहे. निधी असूनही तो खर्च होत नाही. सदरचा निधी वेळेत खर्च न झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
NRHM आयु्क्त आणि NRHM अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज
NRHM आयुक्त धीरज कुमार आणि NRHM च्या अध्यक्षा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी परवानगी घेणे गरजेचे होते. त्यांच्या परवानगीनंतरच प्रदिप नामदे यांच्याकडे IEC आणि औषध खरेदीच्या फायली हाताळण्यासाठी देणे गरजेचे होते. तसेच लेखी आदेशानंतरच नामदे यांनीही संबंधीत कामकाज पाहणे क्रमप्राप्त आहे. मात्र वरिष्ठ कार्यालय आणि वरिष्ठांची परवानगी न घेता गैरप्रकारे सुरू असलेल्या कामकाजांवर NRHM आयु्क्त आणि NRHM अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज असून संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
DHO आणि RKS Co-Ordinators यांच्याकडून प्रतिक्रीया नाही
IEC आणि औषध खरेदीबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि आरकेएस को-ऑर्डीनेटर प्रदिप नामदे यांना प्रतिक्रीया विचारली असता या दोघांनीही प्रतिक्रीया दिली नाही.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण