सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
राज्यातील कोट्यावधी जनतेचे आणि वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या आषाढी वारीकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहते. त्याचाच एक भाग म्हणून वारकरी भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्याकडे लक्ष असते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून यासंबंधीत विविध बैठका, आढावा, पंढरपूर दौरा करून आढावा घेतला जात आहे. परंतु आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. कारण आषाढी वारीत जवळपास 15 ते 20 लाख वारकरी भाविकांना यादरम्यान विविध संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी अत्यावश्यक औषधे खरेदी करणे गरजेचे आहे. परंतु जि. प. आरोग्य विभागाकडून अद्यापपर्यंत औषध खरेदीबाबत ठोस असा कोणताच निर्णय घेतला गेला नाही. ना ही कोणती प्रक्रीया राबविली गेली आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या अशा आषाढी वारीसाठी लीना पुजारी यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करून सक्षम अशा औषध निर्माण अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा औषध निर्माण अधिकारी पदी लीना पुजारी यांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती
आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज व आळंदीपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे निघते. तसेच राज्यभरातून लाखो वारकरी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. या भाविकांसाठी जि. प. आरोग्य विभागातील औषध भांडार मधून औषध खरेदी प्रक्रीया राबविणे, तसा प्रस्ताव सादर करणे, खरेदी प्रक्रीया पूर्ण करणे, भाविक दाखल होण्यापूर्वी संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे ओषधे पोहोचवणे गरजेचे आणि क्रमप्राप्त आहे. परंतु औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी यांना आषाढी वारी आणि औषध खरेदीबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी लीना पुजारी यांची सदरच्या पदावरून हकालपट्टी करून सक्षम अशा औषध निर्माण अधिकारी यांची तत्काळ नियुक्ती करावी आणि आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.
लीना पुजारी यांच्या बेकायदेशीर नियुक्तीची सर्वत्र चर्चा…
-
सध्या औषध निर्माण अधिकारी पदी कार्यरत लीना पुजारी यांच्या नियमबाह्य पध्दतीने केलेल्या नियुक्तीची जिल्हाभर चर्चा.
-
या पदासाठी ना त्यांना आवश्यक अनुभव आहे, ना ही बदलीस पात्र आणि ना ही जेष्ठता यादीनुसार पात्र आहेत.
-
पुजारी यांची बदली प्रा. आ. केंद्र, वळसंग येथून प्रा. आ. केंद्र, अनगर येथे ऑगस्ट 2025 मध्ये झाली होती. त्यानंतर 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या बदलीस पात्र होत्या. परंतु अवघ्या 5 महिन्यात त्यांची नियुक्ती जिल्हा औषध भांडार येथील औषध निर्माण अधिकारी पदी नियुक्ती.
-
या नियमबाह्य पध्दतीने केलेल्या नियुक्तीची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी करण्याची मागणी.
-
या नियुक्ती प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले असुन 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याओगादरच पुजारी यांची नियुक्ती औषध भांडार येथे करण्यात आली आहे.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
“भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे”



