सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
डॉ. भगवान पवार यांच्याकडून पुणे सर्कलमधील सर्व अधिकारी-कर्मचाऱी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना “बेकायदेशीर काम केल्यास याद राखा”, “चुकीचे काम केल्यास खपवून घेतले जाणार नाही”, “चुकीचे वागल्यास सस्पेंड करेन” अशा धमकीवजा सुचना आणि कायदेशीर भाषा वारंवार मिटींग, बैठका, व्हिसी मधुन वापरली जाते. परंतु खुद्द उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून संचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. मर्जीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर डॉ. भगवान पवार मेहरबान का आहेत ? अशी चर्चा पुणे सर्कलमध्ये सुरू आहे.
हे ही वाचा “भगवान भरोसे” असलेला आरोग्य विभाग “राम भरोसे”
उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना संचालकांचे अधिकार बहुतेक मान्य नाहीत. संचालकांकडे रितसर प्रस्ताव पाठवून प्रतिनियुक्त्या करणे बंधनकारक आहे. परंतु डॉ. भगवान पवारांकडून शुभांगी धनंजय मोरे (सहा अधीक्षक, प्रा. म. रू. पुणे. : रोज), तुकाराम बुधाजी पोटे (सहा अधीक्षक, ग्रा. रू. घोडेगाव. : दोन दिवस), राजेश तांदळे (सहा. अधिक्षक, ग्रा. रु. पाबळ येथून प्रा. म. पुणे येथे : रोज), सोमनाथ साळुंखे STDC पुणे : दोन दिवस), सुरेखा भरत वास्ते (कनिष्ठ लिपिक, जिल्हा हिवताप कार्यालय, सातारा. : रोज) आणि प्रसाद विजय जोशी (कनिष्ट लिपिक : दोन दिवस) या सर्वांच्या प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. तसेच रोहित बाबुलला चव्हाण (कनिष्ठ लिपिक, जिल्हा साथरोग केंद्र, पुणे. : दोन दिवस), सतीश आसाराम शेडाळे (वाहन चालक, प्रा. म. रू. पुणे. : रोज) आणि भास्कर कारकुड (आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, परिंचे, जिल्हा पुणे : रोज) यांच्या बेकायदेशीर केलेल्या प्रतिनियुक्त्या सध्या रद्द केल्या आहेत.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
त्यामुळे इतरांना “नियम” दाखवणाऱ्या उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना स्वतःच्या बाबतीत मात्र नियम-अटी दिसत नाहीत का ? वरिष्ठांच्या आदेशाचा स्वतःसाठी गैरवापर केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का ? सदरच्या बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द का केल्या जाऊ नये, प्रतिनियुक्तीवर रूजू असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ ठिकाणी काम नसेल तर, त्यांना इतर कामकाजाच्या ठिकाणी नियुक्ती का दिली जाऊ नये ? असे प्रश्न पुणे सर्कलमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित करत आहेत. त्यामुळे उपसंचालक डॉ. भगवान पवारांवर वरिष्ठांकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भगवान पवारांकडून पुणे सर्कलमध्ये आणखी किती बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या…?
सध्या संबंधीत वरील बेकायदेशीर प्रतिनियुक्त्यांची यादी “सत्ताकारण”च्या हाती लागली आहे. त्यामुळे याच पध्दतीने उपसंचालक डॉ. भगवान पवारांनी पुणे सर्कलमध्ये आणखी किती प्रतिनियुक्त्या बेकायदेशीररित्या केल्या आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा डॉ. भगवान पवारांची 14 वर्षे पुणे सर्कलमध्ये फुगडी
टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा : उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार
क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा




