सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
कुपवाड (सांगली) येथे 19 एप्रिल 2026 रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेत प्रवीण देशमुख ला 1563, विहान राठोड ला 1508 तर नागेश राजमाने याला 1421 आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळाले. अवघ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी घवघवीत यश प्राप्त करत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू ठरले आहेत. या यशामागे प्रमुख कोच गणेश मस्कले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. तर वरील सर्व खेळाडू ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण घेत आहेत.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून संचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या
यावर्षी 2026 मध्ये नवीन खेळाडू तयार होतीलच. आणि येत्या काही काळातच आपल्या अकॅडमीतील आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू राज्यस्तरीय, नॅशनल स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या अकॅडमीचे नाव गौरव करतील, असे मत कोच गणेश मस्कले यांनी व्यक्त केले.
वरील कामगिरीबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे अध्यक्ष सरस्वती झंपले, सचिव गणेश मस्कले, खजिनदार आकाश गायकवाड, सदस्य उज्ज्वला नाईकवडे, विजया भोसले, विद्या मस्कले तसेच अकॅडमीतील सर्व पालक व खेळाडूंनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
हे ही वाचा आरोग्य विभागाकडून आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ ?
300 अधिकारी-कर्मचारी वेतनापासून वंचीत; जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र कुंभार यांचा अजब कारभार
औषध निर्माण अधिकारी पदी लीना पुजारी यांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती




