सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातील वारकरी भाविकांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या सोहळ्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री लक्ष देऊन असतात. जवळपास 15 लाख हून अधिक वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे भाग्य दरवर्षी आरोग्य विभागाला लागते. परंतु यंदा आषाढी वारी तोंडावर आली असताना जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत औषध खरेदीत गोंधळ उडाला आहे. या पदावर सध्या लीना पुजारी कार्यरत आहेत. परंतु त्यांना यापूर्वीचा “औषध निर्माण अधिकारी” पदाचा शुन्य अनुभव असल्याने सध्याच्या औषध खरेदीत गोंधळ उडाला आहे. औषध खरेदी प्रक्रीया देखील चुकीच्या पध्दतीने राबविली जात असल्याने तीही खरेदी रखडण्याची दाट शक्यता आहे. अशातच आरोग्य विभागाच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केंदार यांच्या रडारवर आरोग्य विभागातील अधिकारी आहेत.
हे ही वाचा औषध निर्माण अधिकारी पदी लीना पुजारी यांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती
अनुभव नसताना, बदली नियमांना डावलून आणि जेष्ठता यादीही डावलून लीना पुजारी यांची केलेली नियुक्ती आगोदरपासुनच वादाचा विषय ठरलेला आहे. त्यानंतर आषाढी वारीसाठीची अत्यावश्यक औषध खरेदीमधील गोंधळामुळे लीना पुजारी पुन्हा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तर मार्च एंडमध्ये औषध पुरवठाधारकांना परस्पर केलेले कॉल लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे एकूणच लीना पुजारी, त्यांची बेकायदेशीर नियुक्ती आणि औषध खरेदीतील गोंधळामुळे सध्या जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.
आतातरी अनुभवी औषध निर्माण अधिकारी नेमणे गरजेचे…
सध्या लीना पुजारी यांनी यापूर्वी औषध निर्माण अधिकारी पदावर कधीही कामकाज न केल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जि. प. आरोग्य विभागाने आतातरी “अनुभवी औषध निर्माण अधिकारी” नेमुण आषाढी वारीचे उत्तम नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा अनुभव नसलेल्या फार्मासिस्टची या पदावर नेमणुक केल्यास ऐन आषाढी वारीत पुन्हा त्याच-त्या अडचणींचा सामना आरोग्य विभागाला करावा लागणार आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून संचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या

