सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी संवर्ग बदलचा कार्यालयीन आदेश पारित करून सार्वजनिक आरोग्य विभागातील ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या निर्णयाचे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणातून स्वागत झाले. मात्र या संवर्ग बदलच्या 903 जणांच्या यादीतील नावामध्ये पुण्याचे उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राखी सुहास माने आदींची नावे अनवधानाने वगळ्यात आली आहेत. त्यामुळे उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी सुहास माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा, अशी लेखी तक्रार प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्याकडे छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी केली आहे. तसेच संवर्ग बदलनू वरिष्ठ पदाचा गैरवापर अधिकारी करत असल्याच्या बातम्या यापूर्वी “सत्ताकारण”ने वेळोवेळी प्रसिध्द केल्या आहेत. ज्यामध्ये “DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा“, “अर्हता नसताना महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी सातारकरांकडून प्रयत्न“, “डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची चुप्पी” आदी बातम्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा आषाढी वारी तोंडावर, मात्र जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात…
तसेच छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये सोलापूर जिल्हा आणि पुणे मंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांबाबत गंभीर प्रशासकीय त्रुटी निदर्शनास आणून देत आहोत. संवर्गबाह्य पदावर कार्यरत असलेले 1. डॉ. भगवान पवार, (उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे) 2. डॉ. राखी सुहास माने, (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर) आणि 3. डॉ. श्रीकांत कुलकर्णी, (वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशिक्षण केंद्र – HTC, सोलापूर) यांचा समावेश संवर्ग बदलाच्या आदेशातून असायला हवा, तसेच यांनाही दिनांक 30 जुन 2026 रोजी कार्यमुक्त करणे गरजेचे असताना त्यांना विशेष सुट देण्यात आलेली आहे, असे दिसुन येते. तरी उपरोक्त अधिकाऱ्यांची माहिती पुढे देत असुन ते सर्व अधिकारी आपल्या मुळ संवर्गगाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कार्यरत असल्याने त्यांना त्यांच्या मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवण्यात यावे. तसेच शासन आदेशानुसार विशेषज्ञांच्या सेवा त्यांच्या मूळ संवर्गात होणे अपेक्षित असताना, खालील अधिकारी नियमबाह्यरीत्या पध्दतीने कार्यरत आहेत.
1. डॉ. भगवान पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे)
संवर्ग विसंगती : डॉ. भगवान पवार यांचा मूळ संवर्ग ‘जिल्हा आरोग्य अधिकारी’ (DHO) असताना ते २२.०८.२०२५ पासून ‘उपसंचालक’ (DD) या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
दीर्घकालीन वास्तव्य : ते २७.०८.२००९ रोजी ‘जिल्हा आरोग्य अधिकारी’ म्हणून नियुक्त झाल्यापासून गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ सातत्याने पुणे मंडळ आणि पुणे महसूल विभागातच कार्यरत आहेत. त्यापूर्वीही त्यांनी याच परिमंडळात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. हे महाराष्ट्र बदली धोरणाचे स्पष्ट उल्लंघन असून त्यांची पुणे महसुली विभागा बाहेर बदली होणे आवश्यक आहे.
2. डॉ. राखी सुहास माने (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर)
संवर्ग विसंगती : डॉ. राखी सुहास माने यांनी ‘DORL’ ही पदविका प्राप्त केली असून त्यांची पदोन्नती ENT तज्ज्ञ (नाक-कान-घसा तज्ज्ञ) संवर्गात झालेली आहे. मात्र, त्या सध्या सोलापूर महानगरपालिकेत प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या धोरणानुसार, त्यांना प्रशासकीय पदावरून कार्यमुक्त करून कोणत्याही जिल्हा रुग्णालयात ‘ENT तज्ज्ञ’ म्हणून नियुक्त करावे, जेणेकरून जनतेला त्यांच्या विशेष सेवेचा लाभ मिळेल.
3. डॉ. श्रीकांत कुलकर्णी (वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशिक्षण केंद्र – HTC, सोलापूर)
संवर्ग विसंगती : डॉ. श्रीकांत कुलकर्णी हे केवळ वैद्यकीय अधिकारी संवर्गात असून ते ३१.०८.२०२४ पासून ‘जिल्हा शल्यचिकित्सक’ (Civil Surgeon Cadre) संवर्गाच्या पदावर ‘वैद्यकीय अधिकारी रुग्णालय प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय सोलापूर’ म्हणून कार्यरत आहेत.
प्रशासकीय निष्क्रियता : ज्या ‘HTC’ केंद्रावर त्यांची नियुक्ती आहे, ते केंद्र सध्या अकार्यक्षम (Non-functional) असून त्यांच्या नियुक्तीपासून तिथे एकही प्रशिक्षण झालेले नाही. याउलट, ते नियमबाह्यरीत्या ‘RMO Outreach’ ची कामे पाहत आहेत. एका अकार्यक्षम केंद्रावर विशेषज्ञ नसलेला अधिकारी नियुक्त ठेवणे हा महसूल आणि मनुष्यबळाचा अपव्यय आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून आदिवासी किंवा दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून पदस्थापित करावे.
वरील सर्व अधिकारी पुणे महसूल विभागात आणि पुणे मंडळात विहित मुदतीपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. प्रशासकीय पारदर्शकता आणि आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी, या सर्वांची तात्काळ पुणे मंडळाबाहेरील आदिवासी किंवा अति-दुर्गम भागात त्यांच्या मूळ संवर्गात बदली करण्यात यावी, ही विनंती.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून संचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या




