सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
पुणे सर्कलमधील प्रलंबीत कामाचा तत्काळ निपटारा आणि कामकाज “टॉप”ला घेऊन गेल्याच्या बडाया मारणाऱ्या उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून तक्रारदाराच्या तक्रारीवर तब्बल 10 महिन्यानंतरही रिजल्ट नाही. तक्रारीबरोबर पुरावे देऊनही कागदाला कागद लावण्यासाठी आणि मुळ तक्रारीपासून दोषी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपिक मुजावर यांना वाचविण्यासाठी डॉ. भगवान पवार आणि त्यांची चौकशी समिती खटाटोप करत आहे, त्यामुळे पुणे सर्कलचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, चौकशी समितीचे अध्यक्ष तथा सहा. संचालक डॉ. प्रतापराव सारणीकर आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा चौकशी समिती सदस्य आरिफ सय्यद यांच्यावर जिल्हा न्यायालयात गुन्हे दाखल करणेसाठीची, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 197 अन्वये परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा
छावा संघटनेचे गणेशे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे यांचेकडे सोलापूरचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपिक मुजावर यांच्या गैरकारभाराची चौकशी करून डॉ. संतोष नवले आणि कनिष्ठ लिपिक मुजावर यांना निलंबित करून बडतर्फ करण्याबाबत 10 महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. परंतू अद्यापही या तक्रारीवर संबंधितांकडून कोणतीच कारवाई केलेली नाही. उलट नावाला चौकशी समिती नेमुण डॉ. नवले आणि कनिष्ठ लिपीक मुजावर यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसते. पुरावे देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच ठोस अशी कारवाई केलेली नाही. त्यामुळे बेकायदेशीर कामे करणारे अधिकारी व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी आणि भ्रष्टाचारास कायमचा लगाम घालण्यासाठी डॉ. भगवान पवार, डॉ. प्रतापराव सारणीकर आणि आरिफ सय्यद यांच्याविरोधात मा. जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हे दाखल करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याची माझी ठाम खात्री झालेली आहे, त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यास आपल्या कार्यालयीन स्तरावरून त्वरित परवानगी द्यावी आणि मला नैसर्गिक न्याय मागण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि प्रधान सचिव निपुण विनायक यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा आषाढी वारी तोंडावर, मात्र जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात…
उपसंचालक डॉ. भगवान पवारांकडून संचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या




