सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
औंध जिल्हा रूग्णालय, पुणे येथे कोविड महामारिच्या काळात करोडो रूपयांचा औषध व साहित्य खरेदी घोटाळ्यात मुरली पदशेट्टी यांची महत्त्वाची भुमिका आहे. तर कनिष्ठ लिपीक रियाज सय्यद हे नळ कारागिर भरतीमध्ये एकवर्षानंतर एका उमेदवारास चुकीची नेमणुक दिल्याने चौकशी सुरू आहे. तसेच मनोरूग्णालयात असताना अशाच एका प्रकरणात ते दोषी आढळले आहेत. असे असताना त्यांना वरिष्ठ लिपीक पदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. तरी मुरली पदशेट्टी, रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करा, अशी मागणी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरत शेट्टी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, मुंबई आणि संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा डॉ. भगवान पवार, डॉ. सारणीकर, सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्या…
शरत शेट्टी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, औंध जिल्हा रूग्णालय, पुणे येथे कोविड महामारिच्या काळात करोडो रूपयांच्या औषध व साहित्य खरेदी घोटाळ्यात असणाऱ्या पदशेट्टी यांना पुणे उपसंचालक कार्यालयात नियुक्ती दिली आहे. पदशेट्टी यांनी कोविड काळात लोकल मेडिसिन पर्चेस, व्हीलचेअर खेरेदी, औषध खरेदी, साहित्य खरेदीत कोटीच्या कोटीची उड्डाणे घेतली आहेत. निकृष्ठ दर्जाची औषधे व साहित्य खरेदी करून शासनाला फसवले आहे. तरी अशा घोटाळे करणाऱ्यास सध्या उपसंचालक कार्यालयात नियुक्ती दिली आहे. तरी त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांची जिल्हा बाह्य बदली करावी.
तसेच कनिष्ठ लिपीक रियाज सय्यद यांनी उपसंचालक कार्यालयात असताना नळ कारागिर भरतीत अनियमितता, मनोरूग्णालयात असताना अशाच प्रकारे दोषी आढळले आहेत. असे असताना त्यांना उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळातून वरिष्ठ लिपीक पदी पदोन्नतीने पुणे येथीलच डॉ. बंदरवाला रूग्णालय येथे पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. सध्या रियाज सय्यद यांच्या बदलीस 1 वर्ष होत नाही तोपर्यंत पुन्हा त्यांची उपसंचालक कार्यालयात बदलीसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केल आहे. अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी अशा कर्मचऱ्यांना पुन्हा-पुन्हा उपसंचालक कार्यालयात नियुक्त्या दिल्या जात आहेत. मात्र पात्र उमेदवारांवर यामुळे अन्याय होत आहे. तरी मुरली पदशेट्टी आणि रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करण्याची मागणी शरत शेट्टी यांनी केली आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा
आषाढी वारी तोंडावर, मात्र जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात…
क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा




