सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
सह संचालक (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पद रिक्त असल्याने या कार्यालयातील कामकाज पुर्णपणे ठप्प होते. परिणामी कर्तव्यदक्ष अशा डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सह संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच देण्यात आला आहे. तसेच पुणे मंडळाच्या उपसंचालक पदाचीही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.
हे ही वाचा मुरली पदशेट्टी, रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करा : शरत शेट्टी
सध्या डॉ. पवार हे उपसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) या पदाचा कार्यरत असताना पुन्हा दुसऱ्या महत्त्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. डॉ. राधाकिशन पवार यांनी यापूर्वी पुणे मंडळाचे उपसंचालक पद आणि सहसंचालक (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) ही महत्त्वाची दोन पदे एकाच वेळी सक्षमपणे हाताळली होती. सध्याही त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे मंडळाच्या उपसंचालक पदाचीही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे. कारण सध्या DD केडरमध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवार यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. तसेच संवर्ग बदलच्या आदेशामुळे या पदावरून डॉ. भगवान पवार यांची हकालपट्टी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे या पदासाठी डॉ. राधाकिशन पवार हे प्रयत्नशील असून ते त्या पदासाठी पात्र आणि सक्षमही आहेत. त्यामुळे पुणे मंडळाच्या उपसंचालक पदासाठी त्यांच्या नावाखी चर्चा होत आहे.
डॉ. राधाकिशन बाबुराव पवार यांच्याकडे १८ जुन २०२६ रोजी सह संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षय बीसीजी), पुणे या पदावर अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उप सचिव दिपक केंद्रे यांनी पारित केला आहे. आदेशात म्हटले आहे की, डॉ. राजरत्न त्र्यंबक वाघमारे यांच्याकडून सदर पदाचा कार्यभार प्रशासकीय कारणास्तव काढण्यात आलेला आहे. आता, सह संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षय बीसीजी), पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन बाबूराव पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग), पुणे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.
हे ही वाचा डॉ. भगवान पवार, डॉ. सारणीकर, सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्या…
आषाढी वारी तोंडावर, मात्र जि. प. आरोग्य विभाग अनुभवी औषध निर्माण अधिकाऱ्याच्या शोधात…
उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा




