सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या सांख्यिकी सहायक सचिन दिलीप काकडे यांची बदली अखेर छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच झाली. मात्र सांख्यिकी सहायक असतानाही अनधिकृतपणे PCPNDT चा “आर्थिक टेबल” सोडण्याचा मोह त्यांना सुटता सुटेना. त्यामुळे प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी सध्या काकडेंची “काकड आरती” सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र काकडे हे बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर न झाल्याने सक्षम असे बदली प्राधिकारी तथा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे का ? डॉ. कंदेवाड यांच्या आदेशाला धुडकावण्याची हिंमत्त सांख्यिकी सहायक काकडे यांच्याकडून केली जात आहे, त्यामुळे डॉ. कंदेवाड यांच्या आदेशाला किंमती आहे की नाही ? असे प्रश्न जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात चर्चिले जात आहेत.
हे ही वाचा सह संचालक (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे
सांख्यिकी सहायक सचिन काकडे यांचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी यापूर्वी जि. प. आरोग्य विभाग-सोलापूर येथे 6 वर्षे आणि सध्या जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय येथे 6-7 वर्षे कामकाज पाहिले आहे. त्यांनी आपल्या मुळ पदाचे कामकाज न पाहता इतर मलईदार टेबल सांभाळणे आवडीचा विषय. याबाबत शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात PCPNDT मधील नविन मान्यता आणि नुतनीकरणासाठी टक्केवारी घेऊन कामे केली जात असल्याच्या काकडे यांच्या तक्रारी तत्कालीन प्रधान सचिव-2 एन. नवीन सोना यांच्याकडे केल्या होत्या. यामध्ये ज्यांच्याकडून टक्केवारी दिली जात नाही, त्यांची प्रकरणे सर्वात आगोदर सादर होऊनही प्रलंबीत आहेत. तर ज्यांची टक्केवारी मिळाली आहे, त्यांची प्रकरणे उशिरा सादर होऊनही सर्वात आगोदर निकाली काढल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे काकडे यांच्या कालावधीतील PCPNDT चे नविन आणि नुतनीकरण परवाने तपासण्याची मागणी त्यांनी केली होती.
सचिन काकडे यांच्याकडून वरिष्ठांच्या आदेशाला यापूर्वीही केराची टोपली…
सांख्यिकी संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गातील कामाशिवाय अन्य संवर्गातील कामे देऊ नये, असे वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 25 जुलै 2018 रोजी परिपत्रक जारी केले होते. असे असतानाही सांख्यिकी अन्वेषक सचिन दिलीप काकडे यांनी गेली अनेक वर्षे PCPNDT चे कामकाज पाहिले आहे. परिणामी सांख्यिकी संवर्गातील कामे होत नसल्याने त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास वेळेत सादर होत नव्हता. याबाबतही त्यांची तक्रार तत्कालीन आमाजिआ उपसंचालक डॉ. आर. टी. वाघमारे यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी केली होती.
सध्याही सांख्यिकी सहायक सचिन दिलीप काकडे यांना संचालक, पुणे डॉ. विजय कंदेवाड यांचा आदेश मान्य नाही. त्यामुळे ते बदलीच्या ठिकाणी हजर न होता, सदरची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
हे ही वाचा मुरली पदशेट्टी, रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करा : शरत शेट्टी
डॉ. भगवान पवार, डॉ. सारणीकर, सय्यद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्या…
उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा




