सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही औषध खरेदी करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी औषध खरेदीसाठी निधीही दुप्पट आहे. मात्र सुरवातीपासुन टेंडर प्रक्रीयाच वादाच्या भोवऱ्यात असताना आता आरोग्य विभागातील औषध खरेदीत लाखाचे 12 लाख झाल्याचे पहावयास मिळत आहे. टेंडर मॅनेज करण्यासाठी औषध निर्माण अधिकाऱ्याचा प्रताप ? सुरू आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी काकडेंची “काकड आरती”
आषाढी वारीतील औषध खरेदीत पारदर्शकता, दर्जेदार औषधे व स्पर्धात्मक पध्दतीने कमी दराने टेंडर प्रक्रीया पार पाडण्यासाठी GEM पोर्टलवरून प्रक्रीया राबविली आहे. यामध्ये सप्लायरसाठी सुरवातीला EMD (Earnest Money Deposit) 1 लाख रूपये ठरवलेली होती. तीच EMD आता लाखावरून 12 लाख रूपये करण्यात आली आहे. लाखाचे 12 लाख का ? व कोणी केले ? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र यामुळे आरोग्य विभाग 12च्या भावात जाणार, अशी चर्चा जिल्हा परिषद आरोग्य विभागात रंगली आहे.
औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी यांनी या टेंडर प्रक्रीयेतून चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनाच डावलले आहे. 20 मे 2026 रोजी सदरच्या टेंडरवर मुख्य कार्यकारी अधिकारी जैन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोपूरवाड यांच्या सह्या नसताना किंवा टेंडरला मंजुरी नसताना औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी यांनी सदरचे टेंडर GEM पोर्टलवर फ्लॅश केले आहे आणि त्यानंतर सह्यासाठी फाईल ठेवण्यात आली आहे. तर ATC (Additional Terms & Conditions) वर देखील मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या सह्या आवश्यक आहेत, मात्र ATC वर देखील सह्या दिसुन येत नाहीत. एकंदरीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना डावलण्याचा प्रकार गंभीर आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. राखी माने आदींना मुळ संवर्गाच्या ठिकाणी पाठवा
सह संचालक (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे




