सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कार्यकाळातील प्रतिनियुक्त्या, अस्थायी नियुक्त्या, पदोन्नती, खरेदी आदी बाबींच्या अनुषंगाने त्यांना पदमुक्त करण्यात आले, अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरणी अकोला सर्कलचे उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाघचौरे यांचे देखील नाहक निलंबन करण्यात आले. मात्र ACB, खंडणी, आत्महत्या आणि महिलांच्या प्रकरणात गुन्हे नोंद होऊनही पुणे सर्कलचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना मात्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून अभय दिले जात आहे, याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात आणि राज्यभर चांगलीच चर्चिली जात आहे. तर आरोग्य मंत्र्यांच्या दुटप्पी भुमिकेमुळे त्यांची प्रतिमा देखील मलिन होताना दिसुन येत आहे.
हे ही वाचा तुकाराम मुंढे साहेब, खासगीच नाही तर शासकीय यंत्रणांमध्येही जादा दराने औषध खरेदी…
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा सुरूच आहे. त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे अमरावती जिल्हा स्त्री रूग्णालयातील आग प्रकरणी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सकांपासुन ते अकोला सर्कलचे उपसंचालकापर्यंत एकूण 5 जणांचे निलंबन केले. सध्या डॉ. राजश्री गजानन ढवळे, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुटुंबकल्याण), पुणे आणि डॉ. राजकुमार जगताप, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुटुंबकल्याण), पुणे यांच्या निलंबनाचे आदेश 13 ऑक्टोबर 2026 रोजी पारित केले आहेत. तसेच लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांना पदमुक्त करून या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सतीशकुमार मधुकर सोळंके, जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात आला आहे. यावर डॉ. रेखा गायकवाड यांनी 15 दिवसांवर सेवानिवृत्ती आल्यानंतर सदरची अन्यायकारक कारवाई केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिध्द करत न्याय मागितला आहे. मात्र आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पुणे सर्कलचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावर मात्र कारवाईच्या बाबतीत मेहरबान असल्याचे दिसुन येत आहेत. त्यांच्या या दुटप्पी कारवाईच्या तक्रारी हायकमांडकडेही गेल्या आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून आतातरी डॉ. भगवान पवार यांच्यावर कारवाई होणार का ? अशा चर्चा चर्चिल्या जात आहेत.
हे ही वाचा “आरोग्य मंत्री हटाव, आरोग्य विभाग बचाव”चे विविध पोस्टर सोशल मिडीयावरती व्हायरल


