सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
धमकी आणि शिविगाळ करत स्वतःच्या वाढदिवसासाठी 21 हजार रूपये रक्कम मागितली, परिणामी सदरच्या किरकोळ रकमेसाठी दशरथ कसबे यांच्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाणे येथे नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी विजय उर्फ पम्या तुकाराम चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.
हे ही वाचा “आरोग्य मंत्री हटाव, आरोग्य विभाग बचाव”चे विविध पोस्टर सोशल मिडीयावरती व्हायरल
घडलेली हकीकत अशी की, 5 ऑक्टोबर 2026 रोजी विजय उर्फ पम्या तुकाराम चंदनशिवे हे मध्यरात्री 1 वाजता पत्नीसाठी मेडिकल मधून औषध आणण्यासाठी जात असताना अंबिका चौक येथे दशरथ कसबे यांनी त्याच्या जवळ येत यावर्षी माझा वाढदिवस मोठा साजरा करायचा आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार असे म्हणून त्याकरीता 21 हजार रूपये द्यावेत लागतील असे म्हणत निवडणुकीत तु माझ्या विरूध्द काम केलास, आता तर तू माझे गल्लीत राहण्यास आलास, मी जेवढे पैसे सांगतो तेवढे पैसे पोहोच कर, नाहीतर तुला मी काय आहे ते दाखवून देतो असे म्हणत दशरथ कसबे यांनी चंदनशिवे यांना शिवीगाळ करून तोंडावर चापटा मारून तुला खल्लास करीन, नाहीतर खोट्या गुन्हयात आत घालीन” अशी धमकी दिली. यामुळे दशरथ कसेब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास फौजदार घोडके करीत आहेत.
हे ही वाचा तुकाराम मुंढे साहेब, खासगीच नाही तर शासकीय यंत्रणांमध्येही जादा दराने औषध खरेदी…




