सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये 3 रूपयांची वस्तू 300 रूपयेला विकत असल्याचे निदर्शनास आणले आहे. परंतु दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण” (MMGPA) या शासकीय औषधे खरेदी यंत्रणामध्ये देखील हाच प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रात फक्त खासगी हॉस्पिटल मध्येच जादा दर लावले जात नसून चक्क शासकीय यंत्रणा देखील तेच करत आहे. मग खासगी हॉस्पिटलचा काय गुन्हा ? आपली सार्वजनिक आरोग्य विभागातील “प्राधिकरण” ही शासकीय यंत्रणाच देखील Anti-Hemophilic Factor VIII with Von Willebrands Factor 250 IU हे 1500/- रूपयेचे प्रोडक्ट चक्क 2125/- रूपयेला खरेदी करत आहे. तसेच यातील कंपन्यांकडे नाही संबंधीतं प्रोडक्टचे अधिकृत लायसन्स नाही, ना ही WHO GMP अधिकारीक प्रमाणपत्र नाही, तरीही Responsive ठरवून ऑर्डर देण्यात येत आहेत, तेही सँपल चाचणी न करता. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.
हे ही वाचा औषध महामंडळाकडून जादा दराने औषध खरेदी
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत औषध खरेदीसाठी कार्यरत “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण” मध्ये “Tender No. 266 Rate Contract Of Hemopholia Factor” ची खरेदी पाहता स्वतः MMGPA प्राधिकरण मध्ये गोंधळ असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये Ms. Grifols India Healthcare Pvt Ltd आणि Ms. Reliance Life Science Pvt Ltd या दोन्ही कंपन्यांनी प्री-बिडमध्ये सांगीतले आहे की, 3 आणि 4 नंबरचे प्रोडक्ट एकच आहे. परंतु प्राधिकरण एकच प्रोडक्टचे दोन वेगवेगळे दर लावत आहे. एकाच प्रोडक्टचे दोन वेगवेगळे दर कशाला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मुंढे साहेब येथे सरकारी यंत्रणाच जादा दराने प्रोडक्ट खरेदी करतेय. मग तुम्ही फक्त खासगी हॉस्पिटलनाच जबाबदार का धरत आहात ?
एकच परवाना, एकच प्रोडक्ट आणि दोन वेगवेगळे दर पत्रक…
MMGPA ने Anti-Hemophilic Factor VIII PD 250 IU : 1500/- रूपये दर तर Anti-Hemophilic Factor VIII with Von Willebrands Factor 250 IU : 2125/- रूपये दर लावले आहेत. 3 नंबर प्रोडक्टचे स्पेसिफीकेशन आणि 4 नंबर प्रोडक्टचे स्पेसिफीकेशन सारखेच असताना किंमती मात्र वेगवेगळ्या MMGPA ने दाखवून जादा दराने खरेदी करण्यात येत आहे. म्हणजे एकाच प्रोडक्टचे दोन वेगवेगळे दर असुन, एकच प्रोडक्ट जादा दराने खरेदी करण्यात येणार आहे. एक कंपनी फॅक्टर 8 च्या अधीन राहून तेच प्रोडक्ट 2125/- रूपये तर “दुसऱ्या” परवानाच्या आधीन राहून तेच प्रोडक्ट तीच कंपनी 1500/- रूपये ला देणार आहे. त्यामुळे MMGPA कडून Anti-Hemophilic Factor VIII PD 250 IU हे प्रोडक्ट 1500/- रूपयेला मिळत असताना तेच प्रोडक्ट नाहक जादा दराने खरेदी का ? याकडे तुकाराम मुंढे साहेबांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच यातील कंपन्यांकडे संबंधीतं प्रोडक्टचे अधिकृत लायसन्स नाही आणि WHO GMP अधिकारीक प्रमाणपत्र देखील नाही, तरी याच कंपन्यांना बेकायदेशीरपणे प्राधिकरणातील कोणता अधिकारी ऑर्डर देण्यासाठी प्रयत्नशील आहे, याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतल्यास सर्व सत्य समोर येईल.
हे ही वाचा Maha E Tender | टेंडर राज्यभर प्रसिध्द, पुरवठादार मात्र स्थानिकच हवा
लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची होणार चौकशी




