सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कार्यकाळातील प्रतिनियुक्त्या, अस्थायी नियुक्त्या, पदोन्नती, खरेदी आदी बाबींची चौकशी होणार आहे. त्यासाठी शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची चौकशी समिती नेमली असल्याचे गोपनीय पत्र पुणे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या कार्यालयातून “सत्ताकारण”च्या हाती लागले आहे.
उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे गोपनीय पत्र सहसंचालक (प्रशासन) राजेंद्र भालेराव यांनी 4 सप्टेंबर 2026 रोजी शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनिल भोकरे यांना पाठवले आहे. त्यावर डॉ. सुनील भोकरे यांनी सुधारित चौकशी समिती लातुर उपसंचालक कार्यालयात 28 सप्टेंबर 2026 रोजी उपस्थित राहणार असुन संबंधीत प्रकरणी सर्वतोपरी सहकार्य करण्यात यावे व आवश्यक ते दस्तावेज उपलब्ध करून द्यावे, असे लेखी आदेश लातुर परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांना 17 सप्टेंबर 2026 रोजी दिले आहेत. त्याअनुषंगाने डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीमध्ये डॉ. भगवान पवार, डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. अर्चना भोसले, करूणा सुरवाडे आणि डॉ. अमोल बाग यांचा समावेश आहे.
या चौकशी समितीकडून खालील मुद्द्यांच्या आधारे होणार चौकशी…
-
वैद्यकिय अधिकारी गट-अ ( एस-२०) यांचे प्रतिनियुक्ती, अस्थायी नियुक्ती, बंधपत्रीत वै. अ. यांची नियुक्ती.
-
गट-क व ड संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे नियुक्ती, बदल्या, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रक्रिया बाबत.
-
वैद्यकिय अधिकारी यांची अनिधिकृत गैरहजेरी/खाजगी व्यवसाय/बोगस व्यवसायिका विरुध्द केलेली कार्यवाही.
-
उपसंचालक स्तरावरुन क्षेत्रिय कार्यालये/रुग्णालयांना देण्यात आलेल्या तांत्रीक मंजूरी प्रक्रीया इत्यादी.
- औषधे/उपकरणे/साहित्य सामुग्री इत्यादी खरेदी व इतर आर्थिक बाबीबाबत.
हे ही वाचा मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे
अखेर डॉ. राजेंद्र रूपनवर यांची प्राणज्योत मालवली
45 हून अधिक कंपन्यांनी Shortfall कागदपत्रे सादर करूनही त्यांची तपासणी न करता अपात्र केल्याचा आरोप




