सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी न्यायासाठी मुंबईतील सायनच्या हाय व्हॉल्टेज टॉवरवरती चडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र उपचारादरम्यान डॉ. राजेंद्र रूपनवर यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या कुटूंबीयांकडून व राज्यभरातून सध्या मृत डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मारेकऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी केली जात आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पीए प्रसाद कोंडेदेशमुख, परदेशी, डॉ. लीना मदने आणि पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडून त्रास सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजय काटकर यांनी डॉ. लीना मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावर अद्याप पर्यंत कारवाई केली नाही. कारवाईत दुजाभाव होत असल्याची चर्चा नागरिकांमधुन होत आहे. मात्र सध्या डॉ. राजेंद्र रूपनवर यांची प्राणज्योत मालवली असल्याने यातील वरील सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा 45 हून अधिक कंपन्यांनी Shortfall कागदपत्रे सादर करूनही त्यांची तपासणी न करता अपात्र केल्याचा आरोप
सोलापूरला सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची गरज
DHO डॉ. कोपरुवाड यांच्याकडून पुरूष अधिकाऱ्यांना कोपरखळ्या, महिला अधिकाऱ्यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर





