सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
कार्यालयात अशिरा आलात-काढ नोटीस, कार्यालयातून लवकर गेलात-काढ नोटीस, कामात दिरंगाई झाली-काढ नोटीस, वेळेत पत्रव्यवहार केला नाही-काढ नोटीस, गैरहजर राहिलात-काढ नोटीस, तक्रार आली-काढ नोटीस, कोणाचीही तक्रार नाही, परंतु काम समाधानकारक वाटले नाही-काढ नोटीस… असा उद्योग सध्या सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांचा सुरू आहे. यामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक डॉ. मोहन शेगर यांच्यापासुन ते क्लार्क पर्यंत बहुतांश पुरूष अधिकाऱ्यांना DHO यांनी नोटीसा काढल्या आहेत. परंतु दुसरीकडे औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील या गेल्या 5 वर्षांपासुन त्यांच्या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत नसल्याचे वृत्त “सत्ताकारण”ने 2 महिन्यापूर्वी प्रसिध्द केले. परंतु त्यांच्यावर अद्यापर्यंत कारवाई, नोटीस देणे तर सोडाच, परंतु गैरप्रकारे प्रतिनियुक्ती दिली आणि औषध भांडार मधुन कार्यमुक्त देखील केले नाही. त्यामुळे “DHO डॉ. सतीश कोपरुवाड यांच्याकडून पुरूष अधिकाऱ्यांना कोपरखळ्या, महिला अधिकाऱ्यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर…” अशी चर्चा खुद्द आरोग्य विभागात रंगली आहे.
हे ही वाचा फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना जबाबदार कोण ?
डॉ. सतीश कोपरुवाड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यापसुन ते स्वतः व जि. प. आरोग्य विभाग कायम चर्चेचा विषय ठरलेले आहेत. त्यांच्या कार्यपध्दीवर व कामकाजावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आरोग्य समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यही नाराज आहेत. त्यांच्याकडून काम कमी आणि नोटीसा जास्त, ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही कामाजावेळी, प्रत्येक वेळेस “मी नविन आहे…” असे उत्तर एकूण CEO देखील थक्क झाले आहेत. जि. प. सर्वसाधारण सभेतही आरोग्य विभागातील विविध विषय आणि डॉ. सतीश कोपरुवाड हेच केंद्रस्थानी राहिले आहेत.
रूग्णांना शिपायांकडून चुकीच्या औषध-गोळ्यांचे वाटप…
औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील या गेली 5 वर्षे मुळ नियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर आहेत. औषध भांडार येथे स्वतःच्या सोयीसाठी चुकीच्या पध्दतीने व चुकीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकार नसताना ऑर्डर घेऊन कार्यरत आहेत. परिणामी त्यांच्या मुळ ठिकाणी त्या गैरहजर असल्याने औराद व बुरूड येथे रूग्णांना आरोग्य सेवक, परिचर, शिपायांकडून चुकीच्या औषध-गोळ्यांचे वाटप सुरू आहे. सदरच्या गंभीर व गैरप्रकाराचे व्हिडीओ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरुवाड यांना दाखवले. मात्र 2 महिने होऊनही त्यांनी फार्मासिस्ट पल्लवी पाटील यांना चुकीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त केले नाही. उलट त्यांना पुन्हा लस भांडार येथे घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. औराद आणि बुरूड येथे बरे होण्यासाठी आलेल्या रूग्णांना चुकीच्या औषध-गोळ्यांमुळे साईडइफेक्ट होऊन दुसरेच आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे DHO डॉ. कोपुरवाड यांच्याकडून इतर अधिकाऱ्यांना मात्र नोटीसा, चुकीच्या कामाला मात्र पाठबळ, अशी कार्यपध्दती सुरू आहे. यावर त्यांना प्रतिक्रीया विचारली असता, त्यांनी पल्लवी पाटील आणि लिना पुजारी यांची चौकशी सुरू केल्याची प्रतिक्रीया देत मुळ मुद्द्याची प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ केली.
सेवा शुल्काच्या आडून शासनाची 3 वर्षात 24 कोटींहून अधिकची होणार नाहक लुट
आयुक्त संजय काटकर यांनी NHM अंतर्गत कार्यरत राज्यातील 7 DAM यांना केले पदमुक्त




