सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हास्तरीय Financial Management Group (FMG) चे वित्तीय कामकाज सुरळीत, प्रभावी व सुसूत्रपणे सुरू राहण्यासाठी तसेच प्रशासकीय कारणास्तव उपलब्ध मनुष्यबळ कामकाजाचे सुसुत्रीकरण करण्याकरिता आयुक्त संजय काटकर यांनी NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान) अंतर्गत कार्यरत राज्यातील 7 DAM यांना पदमुक्त केले आहे. तर त्यांच्याकडील कामकाज इतर अर्थसंकल्प व वित्त अधिकारी यांच्याकडे सोपविले आहे.
हे ही वाचा वाढीव सेवा शुल्क, लहान संस्था, MSME किंवा Start-up ला नाकारल्याने मनुष्यबळाचे फेरटेंडर करण्याची गरज
वास्तविक पाहता परभणी, सातारा, नांदेड, जळगाव, ठाणे, वाशिम, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा लेखा व्यवस्थापक (District Accounts Manager (DAM)) यांच्या कामकाजाबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठापर्यंत अनेक तक्रारी होत्या. मात्र सोलापूर जिल्ह्यात एका RKS Coordinators यांनी DHO, CS आणि DD यांच्यामार्फत DAM यांचा “राष्ट्रीय कार्यक्रम” केल्याच्या चर्चा आहेत. कारण याच RKS Coordinators यांनी पूर्वीचा राग मनात धरून DAM यांच्या सर्व पूर्वीच्या तक्रारी, तक्रारदार यांची नावे आणि बरंच काही वरिष्ठांकडे सोपविले. तर सातारा येथील DAM ने तत्कालीन DHO यांच्या काळात प्रामाणिक काम केल्याने त्या DHO ला त्रास झाला होता. परिणामी आता ते पुणे सर्कलचे DD असल्याने पूर्वीचा राग सध्या पदमुक्त मध्ये रूपांतरीत झाला आहे. या सर्व प्रकारांमुळे भविष्यात DAM यांना “पदमुक्त वरून कार्यमुक्त” का केले जाणार नाही ? अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच इतरही जिल्ह्यात पूर्वीच्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधीत DAM यांच्यावर पदमुक्तीची कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांकडून चतुराईने कारवाई अन् हायकोर्टचा रस्ता बंद…
तत्कालीन संचालक डॉ. सतीश पवार यांनी DAM आणि CAM यांच्या तक्रारी आल्याने राज्यातील सर्वच DAM आणि CAM (District Accounts Manager & City Accounts Manager) यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु DAM आणि CAM यांनी संचालकांच्या विरूध्द बदलीचे धोरण नसल्याचे सांगत हायकोर्टमध्ये जाऊन बदल्या रद्द करून घेतल्या. सध्याही 7 DAM यांना कार्यमुक्त करण्याची कुणकुण लागली असल्याने या सर्वांनी हायकोर्टची तयारी करून ठेवली होती. परंतु आयुक्त संजय काटकर यांनी चतुराईने कार्यमुक्त ऐवजी पदमुक्त करून या सर्वांचा हायकोर्टचा रस्ता बंद केला आहे.
या अर्थसंकल्प व वित्त अधिकारी यांच्याकडे सोपविला पदभार…
निलेश निळकंठ-परभणी, अभिषेक आवळे- सातारा, दत्तात्रय सवादे- नांदेड, जाबीर मुजावर- जळगाव, जयवंत विशे- ठाणे, मंगलसिंग राजपूर-वाशिम आणि महेंद्र खोत-सांगली. या सर्वांनी त्यांच्या मुळ पदाचा कार्यभार सांभाळून DAM पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळायचा आहे.
आरोग्य विभागाचा अजब कारभार; ब्लॅक लिस्ट मधील पुरवठाधारकांकडूनच आहार सेवा सुरू




