सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागाला सक्षम असे आरोग्य मंत्री लाभले असतानाही घोटाळ्यांची मालिका थांबायचे नाव घेत नाही. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी खरेदी कक्षाचे सहसंचालक डॉ. उमेश शिरोडकर यांच्यावर खरेदी प्रक्रीयेत गंभीर अनियमितता, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे निलंबीत करून त्यांना घरचा रस्ता दाखवला. मात्र त्यानंतरही खरेदी कक्षातून अनियमितता सुरूच आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्याचे मनुष्यबळ पुरवठा निवेदेत सहभागी 255 पैकी फक्त दोनच पुरवठाधारकांना पात्र ठरवले आहे, तर उर्वरीत 253 पुरठाधारकांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे दोन पात्र असलेल्या आणि वाढीव 15 टक्के सेवाशुल्क नमुद करणाऱ्या Smart Services Pvt Ltd आणि Krystal Integrated Services Ltd वर खरेदी कक्षातील अधिकारी मेहरबान असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ४ हजार ४३८ मनुष्यबळ पुरवठा निविदा क्र. GEM/2025/B/6845403 मध्ये सध्या गंभीर अनियमितता, अत्यल्प स्पर्धा, अवाजवी सेवा शुल्क, संभाव्य कार्टेलायझेशन व शासकीय निधीच्या संभाव्य नुकसानीमुळे या टेंडरची स्वतंत्र चौकशी करून निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मकता, निष्पक्षत: नसून शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षणही केले जात नसल्याची गंभीर गोष्ट समोर आली आहे.
मनुष्यबळ पुरवठा निविदा प्रक्रियेत मोठ्या संख्येने म्हणजे सुमारे २५५ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता, मात्र तांत्रिक पात्रतेच्या प्रक्रियेनंतर केवळ दोनच निविदाकार पात्र ठरल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे दोनच निविदाकार पात्र होण्यामागील कारणे, पात्रता निकष, अपात्र ठरविण्याची कारणे आणि तांत्रिक मूल्यांकन प्रक्रिया यांची स्वतंत्र तपासणी होणे गरजेचे आहे.
(टिप : उद्याच्या “सत्ताकारण”मध्ये वाचा “पात्रता अटींमुळे MSME/Start-up/लघु संस्थांच्या सहभागावर झालेला अन्याय”, “23 फेब्रुवारी 2023 रोजीचे सरकारी आदेशानुसार किमान 3.85 ते कमाल 7 टक्के सेवा शुल्क आकारण्याबाबत लेखी आदेश असताना तसेच इतर विभागात 1 ते 3.85 टक्के सेवा शुल्क असताना इथे 14.99 ते 15 टक्के सेवा शुल्क का स्विकारले जात आहे ? व इतर सविस्तर बाबी…)
हे ही वाचा आरोग्य विभागाचा अजब कारभार; ब्लॅक लिस्ट मधील पुरवठाधारकांकडूनच आहार सेवा सुरू
उपसंचालक (राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग-IEC) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. भगवान पवार यांच्याकडे
उपसंचालकांकडून CS डॉ. वर्षा डोईफोडे, DHO डॉ. सतीश कोपुरवाड यांना नोटीस




