सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
“एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संकल्प सप्ताहाची दैनंदिन आकडेवारी गुगल शिटमध्ये सादर न केल्याने सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांना उपसंचालक (हिमोग्लोबीनोपॅथी) डॉ. सुहास मोहनाळकर आणि सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांना उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी नोटीस बजावली आहे. खुलासा विहित वेळेत व समाधानकारक आढळून न आल्यास आपणावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटीस मध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा “आनंद केमिस्युटिक्स”ला ब्लॅक लिस्ट करून ठेका रद्दची कारवाई कधी ?
कारणे दाखवा नोटीस मध्ये म्हटले आहे की, जागतिक थॅलेसेमिया दिन दि. ८ मे २०२५ रोजी “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाचा शुभारंभ राज्यात करण्यात आलेला आहे. सदर अभियानाच्या एक वर्षपूर्तीनिमित्त दि. १ ते ८ मे २०२६ या कालावधीत “संकल्प सप्ताह” राबविण्यात आलेला आहे. थॅलेसेमिया संकल्प सप्ताहाचा दैनंदिन अहवाल राज्यस्तरावरून दिलेल्या गूगल शीटमध्ये भरण्याबाबत यापुर्वी सुचित केलेले आहे, तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त संक्रमणासाठी SBTC कार्ड देण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याकडून संकल्प सप्ताहाबाबत कोणतीही माहिती अद्यापही राज्यस्तरावरून दिलेल्या गुगल शीटमध्ये भरलेली नाही. राज्यस्तरीय कार्यालयाने वारंवार सुचना देऊनसुध्दा आपल्या जिल्हयातील “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाचा संकल्प सप्ताहाचा दैनिक अहवाल निरंक आहे. सदर बाब अत्यंत खेदजनक व गंभीर आहे. यास्तव सदर बाबतीत आपणावर प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये ? याबाबतचा लेखी खुलासा 2 दिवसात सादर करावा. आपला खुलासा विहित वेळेत व समाधानकारक आढळून न आल्यास आपणावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.
हे ही वाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोटीस देऊनही औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील गैरहजर




