सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील यांची मुळ नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र औराद अंतर्गत प्राथमिक आरोग्य पथक बरूर येथे असतानाही त्या गेल्या 5 वर्षांपासून तेथे कार्यरत नाहीत. परिणामी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत पाटील यांनी कार्यालयीन कामकाज सुरळीत चालण्यात अडचणी येत असल्याने गैरहजर असलेल्या औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस बजावूनही पाटील या अद्याप पर्यंत मुळ नियुक्तीच्या ठिकाणी गैरहजरच आहेत.
हे ही वाचा 5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार
सदरच्या कारणे दाखवा नोटीस मध्ये म्हटले आहे की, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालण्यासाठी आपणास प्राथमिक आरोग्य केंद्र औराद ता. द. सोलापूर अंतर्गत बरूर पथक येथे आठवड्यातील 3 दिवस सोमवार, बुधवार, शुक्रवार व प्राथमिक आरोग्य केंद्र औराद येथे 3 दिवस रविवार, मंगळवार, गुरूवार याप्रामाणे उपस्थित राहून कामकाज करणेसाठी आदेश देण्यात आले होते. तथापि आपण या कार्यालयाकडे हजर झालले नाहीत, तरी अद्यापपर्यंत का हजर झालेले नाहीत ? याचा लेखी खुलासा 3 दिवसाच्या आत या कार्यालयाकडे सादर करावा. अन्यथा आपल्या विरूध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपिल नियम 1967 नुसार कार्यवाही करण्यात येईल.
सदरची कारणे दाखवा नोटीस वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत पाटील यांनी औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील यांना 16 जुन 2026 रोजी बजावली आहे. परंतु अद्याप पर्यंत त्या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर “महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपिल नियम 1967 नुसार” काय कार्यवाही करण्यात येणार आहे ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना जबाबदार कोण ?
डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी




