सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत डॉ. राधाकिशन पवार यांनी संबंधित आरोग्य संस्थेला क्षेत्रीय भेट देऊन कार्यक्रमाच्या विविध घटकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुग्ण शोध मोहीम, NAAT तपासणी, क्षयरोग प्रतिबंधक उपचार (TPT), उपचार तसेच निक्षय पोर्टलवरील रुग्ण नोंदणी बाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक त्या सुचना दिल्या.
हे ही वाचा पावसाळी अधिवेशनातही ॲड. अनिल परब, योगेश टिळेकर यांच्या रडारवर डॉ. भगवान पवार…
या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, फलटण तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, नातेपुते आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरुची येथे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, वेळेत निदान, नियमित उपचार, संपर्कातील व्यक्तींची तपासणी तसेच निक्षय पोर्टलवरील माहिती अचूक व वेळेवर नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमातील उणिवा दूर करून क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी NTEP अंतर्गत सर्व प्रमुख निर्देशांकांचा (Key Indicators) सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्ण शोध मोहीम, NAAT तपासणी, TPT, उपचार यश, निक्षय नोंदणी, निक्षय पोषण योजना, विभेदित टीबी काळजी (Differentiated TB Care), संपर्क तपासणी (Contact Tracing), औषध उपलब्धता, प्रयोगशाळा सेवा तसेच TB मुक्त भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आणि संबंधित आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा डॉ. विजय कंदेवाड यांच्या आदेशाला डॉ. डोईफोडे, डॉ. शेगर यांच्याकडून केराची टोपली
3 लाख रूपये लाच प्रकरणातील तक्रारदारास डॉ. भगवान पवार, घ्यार यांच्याकडून त्रास सुरू
फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना जबाबदार कोण ?




