सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
पुणे सर्कलचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडून तक्रारदारास नियुक्ती आदेश देण्याकरिता रामकिसन गंगाधर घ्यार याने रोख 3 लाख रूपयांची लाच स्विकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडून घ्यार ला रंगेहाथ पकडले होते. यामुळे डॉ. भगवान पवार आणि घ्यार चांगलेच अडचणीत आले होते. परिणामी याचा राग मनात धरून सध्या 3 लाख रूपये लाच प्रकरणातील तक्रारदारास डॉ. भगवान पवार आणि रामकिसन घ्यार यांच्याकडून त्रास सुरू असल्याचे खुद्द तक्रारदार यांनी “सत्ताकारण”ला सांगितले.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
3 लाख रूपये लाच प्रकरणाच्या व्देशभावनेतून उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी तक्रारदारावर वेगळ्या विषयात चौकशी समिती नेमली आहे. परंतु यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी यापूर्वी तक्रारदार यांना संरक्षण देणे प्राथमिक कर्तव्य असल्याने तसे पत्र जिल्हा हिवताप अधिकारी, हिवताप कार्यालय येरवडा, पुणे यांना 16 जानेवारी 2026 रोजी पाठवले आहे. ज्यामध्ये तक्रारदारांची कागदपत्रे गोपनीय असून ती उपलब्ध करून न देण्याचे सुचीत केले आहे. असे असताना उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी सोमनाथ जगन्नाथ कांबळे यांच्या तक्रारी अर्जावर 8 जुन 20026 रोजी चौकशी समिती नेमली आहे. ज्यामध्ये चौकशी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सुहास कोरे, प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध, पुणे, तर सदस्यपदी डॉ. अविनाश पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, पंढरपूर, जि. सोलापूर, दत्ता श्रृंगारे, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे आणि गणेश औटी, कार्यालयीन अधीक्षक (लेखा विभाग), आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांचा समावेश आहे. सदरची चौकशी समिती आज, 1 जुलै 2026 रोजी जिल्हा हिवताप अधिकारी, हिवताप कार्यालय येरवडा, पुणे येथे ठाण मांडून होती. परंतु येथील हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षांना व सदस्यांना ACB पुणे कडून आलेल्या पत्राबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे चौकशी समिती या कार्यालयात पोहचली होती. यानंतर “सत्ताकारण”च्या प्रतिनिधीने चौकशी समितीला प्रतिक्रीया विचारली असता त्यातून सदरची गोष्ट त्यांना समजली.
ACB च्या रडारवर जिल्हा हिवताप अधिकारी, चौकशी समितीचे अध्यक्ष आणि सदस्य…
ACB पुणे यांच्याकडून सदरच्या 3 लाख रूपये लाच प्रकरणी उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि रामकिसन घ्यार यांच्यावर गुन्हा नोंद आहे. तक्रारदार यांच्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी यांना गोपनिय पत्र पाठवले आहे. असे असताना तक्रारदार यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने वरिल सर्व प्रकार सुरू आहे. परिणामी तक्रारदार आज सकाळी ACB पुणे यांच्या कार्यालयात याविरोधात दाद मागण्यासाठी गेले होते. त्यावर तक्रारदार यांच्याकडून ACB कार्यालय, पुणे यांनी सदरची सर्व माहिती घेतली आहे. ज्यामध्ये डॉ. भगवान पवार, रामकिसन घ्यार यांना साथ देणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अपर्णा पाटील, चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास कोरे, सदस्य डॉ. अविनाश पाटील, दत्ता श्रृंगारे आणि गणेश औटी हे ACB पुणे यांच्या रडारवर असल्याचे खात्रीलायक वृत्त “सत्ताकारण”ला मिळाले.

हे ही वाचा फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना जबाबदार कोण ?
5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार




