सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
शासकीय दवाखान्यांमध्ये गरीब, गरजू रूग्ण उपचारांसाठी येतात. आजार बरा होण्यासाठी उपचार घेतात, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र औराद येथे आजारी रूग्णांना आरोग्य सेवक, शिपाई यांच्याकडून चुकीच्या औषध-गोळ्यांच्या वाटपामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे. रूग्ण एका आजारातून बरा होण्याऐवजी दुसऱ्याच गंभीर आजारांच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. कारण येथे नियुक्त फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील या कित्येक वर्षांपासुन गैरहजर आहेत. त्यांच्या गैरहजेरीत आरोग्य सेवक, शिपाई यांच्याकडून रूग्णांना औषध-गोळ्यांचे वाटप केले जात आहे. आरोग्य सेवक, शिपाई यांना ना ही औषधांची मात्रा माहिती आहे, ना ही औषध-गोळ्यांची नावे, ना ही कोणत्या आजारावर कोणती औषधे दिली जातात याचे ज्ञान. त्यामुळे औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर अचुक निदान करण्यापेक्षा फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे रूग्णांचा जीव गेल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्याकडून कारवाई केली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा 5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार
रुग्णांना चुकीच्या औषध-गोळ्या दिल्यास पुढील गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. तसेच चुकीच्या औषध-गोळ्यांमुळे अधिक तीव्र आजार, नको ते डोस, रुग्णाचे वय आणि आरोग्यस्थिती यावरून अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.
-
रोग बरा न होणे किंवा वाढणे : योग्य औषध न मिळाल्याने आजार नियंत्रणात येत नाही, उलट काही प्रकरणांमध्ये रोग अधिक गंभीर होऊ शकतो.
-
औषधांचे दुष्परिणाम (Side Effects) : मळमळ, उलट्या, चक्कर येणे, पोटदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ किंवा खाज येणे.
-
ॲलर्जिक प्रतिक्रिया : श्वास घेण्यास त्रास, चेहरा, ओठ किंवा घसा सुजणे, गंभीर परिस्थितीत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
-
अवयवांचे नुकसान : चुकीच्या औषधांमुळे यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidney) किंवा हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
-
औषधांचा ओव्हरडोस : जास्त प्रमाणात औषध दिल्यास बेशुद्धावस्था, झटके किंवा मृत्यूचा धोका वाढू शकतो.
-
प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (Antibiotic Resistance) : चुकीची किंवा अपुरी अँटिबायोटिक्स दिल्यास जंतू औषधांना प्रतिकारक बनू शकतात.
-
रुग्णाच्या जीवाला धोका : मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग किंवा इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये चुकीच्या औषधांमुळे जीवघेणे परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे औषधांचे वाटप केवळ पात्र आणि प्रशिक्षित फार्मासिस्ट किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची औषधांचे वाटप करणे रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे.
हे ही वाचा आरोग्य विभागातील औषध खरेदीत लाखाचे 12 लाख…
प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी काकडेंची “काकड आरती”
सह संचालक (कुष्ठरोग व क्षय बीसीजी) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे




