सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
आरोग्य सेवा (राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग) पुणे चे उपसंचालक कैलास बाविस्कर हे नियत वयोमानाने ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सदरील रिक्त पदाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसे आदेश सहसंचालक (प्रशासन) राजेंद्र भालेराव यांनी 31 जुलै 2026 रोजी जारी केले आहेत.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
पुढील आदेश होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. भगवान पवार यांचेकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे याच पदावर अनेकवेळा, अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कैलास बाविस्कर यांनी सेवानिवृत्ती नंतर 2 वर्षे मुदतवाढीसाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. तर या पदासाठी सदरच्या कार्यालयांतर्गत MPSC मार्फत निवड झालेले सक्षम असे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उपलब्ध आहेत. इतरही अनुभवी व पात्र अधिकारी उपलब्ध आहेत. असे असताना डॉ. भगवान पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने सहसंचालक (प्रशासन) राजेंद्र भालेराव यांच्या विरोधात नाराजीचा सुरू आहे.

हे ही वाचा क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा
आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
उपसंचालकांकडून CS डॉ. वर्षा डोईफोडे, DHO डॉ. सतीश कोपुरवाड यांना नोटीस





