सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
बॅरिअर वॉशिंग तंत्रज्ञान (Barrier Washing Technology) निर्जंतुकीकरणाचा वापर करून बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, रुग्णांचे आणि कर्मचाऱ्यांचे कपडे पूर्णतः मानवी हस्तक्षेपाशिवाय धुतले जावे, परिणामी संक्रमणमुक्त, संसर्ग नियंत्रण व स्वच्छ लिनन उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालयांमधील स्वच्छता आणि आरोग्य शिस्तीचा दर्जा आणखी उंचावला जावा, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 593 सरकारी रुग्णालयांसाठी मेकॅनिकल लॉन्ड्री (Mechanical Laundry) सेवा १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथील आरोग्य संचालनालयातून ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करून सुरू केली. परंतु वास्तवात उद्घाटनापुरती नावालाच “मेकॅनिकल लॉन्ड्री” अस्तित्वात असुन राज्यातील जवळपास 90 टक्के रूग्णालयात घरगुती वॉशिंग मशीन बसवुन व इतरांकडून कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे संबंधीत सप्लायर “आनंद केमिस्युटिक्स कंपनी” आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवळपास 600 कोटींचे टेंडर असुनही चक्क आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचीच फसवणुक केली असुन “आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन करवून घेतले आहे.
मुळात Mechanical Laundry चे टेंडर मर्जीतील ठेकेदार “आनंद केमिस्युटिक्स कंपनी” याना देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारीच जबाबदार आहेत. या कंपनीला संबंधीत कामाचा कोणताही अनुभव नसताना सदरचे टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”कडून Mechanical Laundry ची सेवा देताना गोंधळ उडाला आहे. त्यांच्याकडून सध्या (उदा.) 100 किलो लाँड्री करून मटेरिअल दिले असता ते दुप्पट 200 किलो दाखवले जात आहे, अशा पध्दतीने खोटी व वाढीव बिले काढली जात आहेत. तसेच मुंबई मधील एखाद्या जिल्हा रूग्णालयातील “नविन वस्त्रे” धुलाईसाठी घेऊन जाणे आणि धुलाई नंतर इतर ठिकाणची “जुनी वस्त्रे” मुंबई मधील जिल्हा रूग्णालयाला देणे, नविन आणि जुन्या वस्त्रांची अदलाबदल होणे, असे प्रकार वांरवार झाले आहेत. त्याहुन कहर म्हणजे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णाल, उपजिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय आदी ठिकाणी अत्याधुनिक Mechanical Laundry ची यंत्रसामग्री बसवण्याऐवजी घरगुती Washing Machine मशीन बसवले आहेत. मग असे असेल तर “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”ने Advance, Against Dispatch, Against Installation रक्कम कशासाठी घेतली आहे ?
सदरील यंत्रणा राज्यातील ५९३ सरकारी आरोग्य संस्थांमध्ये सुमारे 29 हजार हून अधिक खाटांसाठी बेडशीट, ब्लँकेट, उशांचे कव्हर, पडदे, टॉवेल आणि कर्मचारी गणवेश यांची यांत्रिक व निर्जंतुकीकृत धुलाई करणार आहे. या सुविधेमुळे राज्यातील २० जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, १०५ उपजिल्हा रुग्णालये, ३७८ ग्रामीण/प्रादेशिक रुग्णालये, २२ महिला रुग्णालये आणि ६० ट्रॉमा केअर युनिट्स मधील २५ लाखांहून अधिक रुग्णांना फायदा मिळणार आहे. परंतु “आनंद केमिस्युटिक्स कंपनी-पुणे”ने घरगुती Washing Machine बसवुन चक्क आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची फसवणुक केली आहे. दुसरीकडे यापूर्वी त्या-त्या जिल्ह्यातील ठेकेदार यापेक्षा कमी दराने आणि उत्कृष्ठ पध्दतीने कामकाज करत होते. मात्र “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”ने या सर्वांना घरचा रस्ता दाखवत स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यावधीचे टेंडर स्वतःच्या घशात घातले आहे. याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना प्रतिक्रीया विचारली असता अद्यापपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. परंतु सदरचा गैरप्रकार “सत्ताकारण”ने उजेडात आणल्यानंतर तरी आरोग्य मंत्री “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”ला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार की अपमान सहन करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फोटो : ग्रामीण रूग्णाल पांगरी येथे Mechanical Laundryच्या नावाखाली बसवलेली Washing Machine…
हे ही वाचा पावसाळी अधिवेशनातही ॲड. अनिल परब, योगेश टिळेकर यांच्या रडारवर डॉ. भगवान पवार…
डॉ. विजय कंदेवाड यांच्या आदेशाला डॉ. डोईफोडे, डॉ. शेगर यांच्याकडून केराची टोपली
5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार




