सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
“आनंद केमिस्युटिक्स कंपनी” आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन केल्याच्या कारनाम्यानंतर आता “सत्ताकारण”च्या माध्यमातून खोट्या बिलांची गोष्ट समोर आणत आहोत. “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”ने Mechanical Laundry च्या नावाखाली काही ठिकाणची कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर केली आहेत. यामध्ये आर्थिक अनियमितता झाली आहे. या गैरप्रकारात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून या बिलांच्या टक्केवारीमध्ये त्या-त्या जिल्ह्यातील MS, CS आणि 8 सर्कलमधील 8 DD पासुन ते आरोग्य भवनमधील खरेदी कक्षापर्यंत धागेदोरे पोहचले आहेत. त्यामुळे यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे काय कारवाई करतील ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?

“आनंद केमिस्युटिक्स कंपनी”कडून काही ठिकाणची योग्य ती बिले सादर केली आहेत, परंतु अशीही अनेक ठिकाणे आहेत, जेथील बिले सर्टीफाईड न करता आयुक्तांकडे मोघमपणे सादर केली आहेत. ज्या ठिकाणी शुन्य काम आहे, तेथीलही बिले सादर केली आहेत. “आनंद केमिस्युटिक्स कंपनी”ने फक्त मोठ-मोठ्या जिल्ह्यात काम सुरू केले आहे. परंतु 35 पैकी इतर अनेक अशा छोट्या जिल्ह्यातील एकाही ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय व इतर ठिकाणी सेवाच सुरू नाही. तेथे इतर ठेकेदारांकडून ही काम करून घेतले जात नाही. मात्र बिले सादर केली गेली आहेत. या सादर केलेल्या बिलांवर कोणत्याही रूग्णालयाचा तपशील नाही. कोणत्या ठिकाणी काम केले आहे ? किती किलो वस्त्र धुलाई केली आहे ? धुलाईचा दर व कोणत्याही संबंधीत रूग्णालयाच्या प्रमुखांचा सही-शिक्का बिलांवर नाही. थेट बिलांचे आकडे टाकूण ती बिले “मा. आयुक्त, सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य भवन, मुंबई.” या नावे सादर केली आहेत.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास यातील गैरप्रकार आला आहे. सध्या जवळपास 70 कोटी रूपयांची बिले थकवली आहेत. परंतु ती लवकरच अदा होण्याच्या मार्गावर आहेत.
स्वतःच्या खात्याकडूनच आरोग्य मंत्र्यांची फसवणुक…
आरोग्य सेवा देणाऱ्यांकडून जनतेचे काय हाल सुरू आहेत ? हे अधिवेशनात जनतेला आणि आरोग्य मंत्र्यांना समजलेच आहे. परंतु येथे खुद्द आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचीच स्वतःच्या खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि सप्लायर कडून फसवणुक केली गेली आहे. स्वतःच्या खात्याकडूनच आरोग्य मंत्र्यांची फसवणुक ही गंभीर बाब आहे. यावर मंत्री काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी
पावसाळी अधिवेशनातही ॲड. अनिल परब, योगेश टिळेकर यांच्या रडारवर डॉ. भगवान पवार…




