सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागात खोटी कागदपत्रे, खोट्या पदव्यांच्या आधारे शासनाची कोट्यावधी रूपयांची लुट करणारी टोळी आजही कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे “3 व 6 अतिरिक्त वेतनवाढी”चा विषय. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) व शासन नियमांचे उल्लंघन करून अपात्र पदविका (CPS) व पदवी (YCMOU) धारक काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर अतिरिक्त वेतनवाढी प्रत्यक्षात मिळवल्या आहेत. ज्यामध्ये डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. विनोद अभिवंत यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे अपात्र पदव्यांच्या आधारे अतिरिक्त वेतनवाढी घेणाऱ्या डॉ. श्रीकांत कुलकर्णी आणि डॉ. विनोद अभिवंत यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधीत रकमेची वसुली करावी, या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि प्रधान सचिव निपुण विनायक यांनी शासनाची कोट्यावधी रूपयांची होणारी लूट थांबवणे गरजेचे आहे.
हे ही वाचा पावसाळी अधिवेशनातही ॲड. अनिल परब, योगेश टिळेकर यांच्या रडारवर डॉ. भगवान पवार…
सार्वजनिक आरोग्य विभागामधील शासकीय सेवेतील एका गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता म्हणजे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदविका व पदवीसाठी अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा नियम होय. परंतु काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC, New Delhi) नियमांना बगल देऊन अपात्र पदव्यांच्या आधारे हा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील डॉ. कुलकर्णी आणि डॉ. अभिवंत यांनी अगोदरच हा लाभ घेऊन शासनाची कोट्यावधी रुपयांची लूट केलेली आहे.
या संदर्भात खालील वस्तुस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ चौकशीची आवश्यकता आहे…
१. CPS मुंबई (College of Physicians and Surgeons) : सीपीएस मुंबई ही राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे (NMC) मान्यताप्राप्त विद्यापीठ (Recognised University) नाही. एनएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या पदविका मान्यताप्राप्त नाहीत, त्या वैद्यकीय सेवेत अतिरिक्त आर्थिक लाभांसाठी (Increments) ग्राह्य धरता येत नाहीत, असे असतानाही डॉ. श्रीकांत कुलकर्णी, नेमणूक वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांनी सदर पदवी च्या आधारे अनेक वर्षांपासून 3 अतिरिक्त वेतनवाढी मंजूर करून घेतल्या आहेत व दरमहा त्याव्दारे मूळ वेतनापासून सर्वच भत्ते अधिकतम दराने घेत आहेत.
२. YCMOU नाशिक (M.P.H. Degree) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) हे एक मुक्त विद्यापीठ (Open University) आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांनुसार, मुक्त विद्यापीठांना वैद्यकीय शाखा (Medical Stream) किंवा क्लिनिकल विषयांशी संबंधित अशा पदव्या व पदविका देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली ‘एम.पी.एच.’ (MPH) किंवा इतर कोणतीही पदवी ही शासन निर्णयानुसार ६ अतिरिक्त वेतनवाढीसाठी पात्र ठरत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा क्षयरोग केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ. विनोद अभिवंत यांनी या “नॉन मेडिकल डिग्री”च्या आधारे 6 अतिरिक्त वेतनवाढी स्वतःला मंजूर करून घेतल्या आहेत.
३. कायदेशीर तरतूद व नियमांचे उल्लंघन : ३ आणि ६ अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ हा केवळ आणि केवळ NMC नवी दिल्ली आणि MUHS नाशिक सारख्या अधिकृत वैद्यकीय विद्यापीठांमधून वैध व मान्यताप्राप्त क्लिनिकल पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठीच आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, ज्या उमेदवारांनी सीपीएस (CPS) किंवा वायसीएमओयु (YCMOU) मधून अशा प्रकारच्या अनधिकृत पदव्या प्राप्त केल्या आहेत, त्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावांची कसून तपासणी करण्यात यावी. तसेच कोणत्याही अपात्र उमेदवाराला बेकायदेशीरपणे ३ किंवा ६ वेतनवाढ मंजूर केली जाऊ नये.
जर अशा अपात्र उमेदवारांना यापूर्वी लाभ मिळाला असल्यास, त्याची तात्काळ वसुली (Recovery) करण्यात यावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. शासकीय निधीचा असा गैरवापर रोखण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी प्रधान सचिव निपुण विनायक यांनी करणे गरजेचे आहे. तसेच अपात्र पदव्यांच्या आधारे अतिरिक्त वेतनवाढी घेणाऱ्या डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. विनोद अभिवंत यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधीत रकमेची वसुली करावी आणि शासनाची कोट्यावधी रूपयांची होणारी लूट थांबवावी.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी
डॉ. विजय कंदेवाड यांच्या आदेशाला डॉ. डोईफोडे, डॉ. शेगर यांच्याकडून केराची टोपली
3 लाख रूपये लाच प्रकरणातील तक्रारदारास डॉ. भगवान पवार, घ्यार यांच्याकडून त्रास सुरू




