सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीचा बहुतांश काळ पुणे सर्कलमध्ये कार्यरत असले, तरी राज्यभर प्रसिध्द असलेले निवडकमधील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. भगवान पवार. कधी महिलांच्या तक्रारीमुळे, तर कधी महीलांकडून गुन्हे दाखल केल्यामुळे, कधी ACB ट्रॅप मुळे तर कधी फलटणमध्ये गुन्हा नोंद झाल्यामुळे, कधी तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या निलंबनामुळे तर कधी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या केलेल्या निलंबनामुळे, कधी DHO केडरमध्ये असुनही DD केडरमध्ये उपसंचालकपद मिळवल्यामुळे तर कधी ACB मधील तक्रारदाराची चौकशी लावल्यामुळे, तेच डॉ. भगवान पवार सध्या पावसाळी अधिवेशनातही ॲड. अनिल परब आणि योगेश टिळेकर यांच्या रडारवर असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागात पुणे सर्कलच नाही तर राज्यभर भगवान पवार चर्चेत आहेत.
हे ही वाचा डॉ. भगवान पवारांची 14 वर्षे पुणे सर्कलमध्ये फुगडी
पुणे सर्कलचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची 5 हजार 1 कामे चांगली आहेत, पण आरोग्य मंत्री महोदय सोडले तर त्याचा विचार कोणीच करत नाही. भगवान पवारांच्या चांगल्या कामाविरोधात सर्व जुने मित्रच सध्या त्यांचे शत्रु म्हणुन एकत्रित आलेले. सर्व मित्र शत्रुत रूपांतरीत होण्यासाठी शेवटी “भगवान”यांचेच कर्तृत्व आणि आर्शिवाद कारणीभुत, हेही तेवढेच खरे. असो, सध्या पावसाळी अधिवेशनात ॲड. अनिल परब आणि योगेश टिळेकर यांनी (तारांकीत आणि अतारांकीत प्रश्न क्रमांक 10430 आणि 7645) डॉ. भगवान पवारांच्या कार्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये ACB ट्रॅपमुळे ॲड. अनिल परब यांनी “उपसंचालक, पुणे आरोग्य विभाग यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करणेबाबत…” प्रश्न उपस्थित केला असुन यामध्ये सातारा येथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, त्यांच्या विरूध्द आंदोलन, यावर कारवाई का नाही ? विलंबाची कारणे ? असे मुद्द उपस्थित केले आहेत. योगेश टिळेकर यांनीही ACB ट्रॅप बाबत कारवाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
यापूर्वी सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि ब्रम्हपूरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. भगवान पवारांवरील कारवाई बाबत विधानसभा तारांकीत प्रश्न क्रमांक 25522 हा प्रश्न सादर केला होता. परंतु 2 मार्च रोजी सुट्टी आल्याने तो प्रश्न उपस्थित झाला नाही. आता अनिल परब आणि योगेश टिळेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे किती आमदारांकडे डॉ. भगवान पवार धाव घेतील ? विरोधकांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थिति करण्यासाठी नवा आमदार शोधून ठेवलाय, अशी चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे. त्यामुळे डॉ. भगवान पवारांचा आज-ना-उद्या “राष्ट्रीय कार्यक्रम” होणार आहे, हे मात्र निश्चीत.
हे ही वाचा DD केडर मध्ये नसलेल्या डॉ. भगवान पवारांना DHO किंवा MOH करा
3 लाख रूपये लाच प्रकरणातील तक्रारदारास डॉ. भगवान पवार, घ्यार यांच्याकडून त्रास सुरू
5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार




