सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांनी 8 जुन 2026 रोजी गट क संवर्गातील 10 सांख्यिकी सहायकांच्या आणि 10 जुन रोजी 43 कनिष्ठ लिपीकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बदली झालेले कर्मचारी नवीन ठिकाणी हजर होण्यास तयार आहेत. परंतु त्या-त्या ठिकाणच्या वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना रिलिव्ह केले गेले नाही. यामध्ये सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे आणि डॉ. मोहन शेगर यांचा यामध्ये समावेश असुन त्यांनी संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
हे ही वाचा 3 लाख रूपये लाच प्रकरणातील तक्रारदारास डॉ. भगवान पवार, घ्यार यांच्याकडून त्रास सुरू
आदेशात असेही म्हटले आहे की, जे कर्मचारी कालमर्यादेचे पालन करणार नाहीत आणि पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न होता परस्पर गैरहजर राहतील, अशा कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती अनधिकृत अनुपस्थिती म्हणून समजण्यात येईल आणि त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला जाईल. तरी कर्मचाऱ्यांच्या या नुकसाणीस जबाबदार कोण ? रिलिव्ह करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचे यातील कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे रक्कम अदा केल्याशिवाय कर्मचाऱ्यांना रिलीव्ह केले जाणार नाही का ? अन्यथा अद्यापपर्यंत रिलीव्ह का केले गेले नाही ? असे प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात चर्चिले जात आहेत. यावर संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड काय निर्णय घेणार आहेत ? आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा प्रशासकीय बदली रद्द करण्यासाठी काकडेंची “काकड आरती”
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रशासकीय बदल्यांची यादी आम्हाला मेलवरदेखील मिळाली नाही किंवा मेलवरून डिलीट केली गेली असेल. परंतु काकडेंची बदली झाली असल्याने त्यांना रिलीव्ह केले जाईल. यावर सदर बदल्यांची यादी “सत्ताकारण”कडून डॉ. डोईफोडे यांना देण्यात आली. परंतु याला 10 दिवस झाल्यानंतर देखील डॉ. डोईफोडे यांनी काकडे यांना रिलीव्ह केले नाही. तसेच डॉ. मोहन शेगर यांनी देखील जुन अखेरपर्यंत रिलीव्ही करतो असे सांगितले, परंतु त्यांनीही अद्यापर्यंत कर्मचाऱ्यांना रिलीव्ह केले नाही. याबाबत संचालक (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांना प्रतिक्रीया विचारली असता, अद्यापर्यंत त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
पैसे घेऊन अंशतः बदल करण्यासाठीचा खटाटोप…?
प्रशासकीय बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना एकीकडे पैसे न दिल्याने वरिष्ठ रिलीव्ह करत नाहीत. तर दुसरीकडे अनेक कर्मचाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी बदलीसाठी पैसे घेऊन अंशतः बदल करण्यासाठी देखील रिलीव्ह केले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे समुपदेशनानंतर प्रशासकीय बदल्या नावालाच आहेत. बदल्यांचा खेळ हा निव्वळ पैसे कमावण्याचा उद्योग असल्याची चर्चा खुद्द संबंधीत कर्मचारीच करत आहेत.
हे ही वाचा 5 वर्षे गैरहजर फार्मासिस्ट पल्लवी गडदे-पाटील यांना फुकट पगार
फार्मासिस्टविना आरोग्य सेवक, शिपायांकडून औषध-गोळ्या वाटपांच्या दुष्परिणामांना जबाबदार कोण ?
मुरली पदशेट्टी, रियाज सय्यद यांची जिल्हाबाह्य बदली करा : शरत शेट्टी




