सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथील उपसंचालकपदी कार्यरत डॉ. भगवान पवार यांची जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट, परिश्रम आदीला तोड नाही. कारण या सर्वांच्या जोरावर त्यांनी पुणे सर्कलमध्ये जवळपास 14 वर्षे आरोग्य सेवा देण्याचा पराक्रम केला आहे. दिवसरात्र परिश्रम करून आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. भगवान पवारांची आरोग्य विभागातील इतर 7 मंडळांतील जनतेला आणि शासनाला अजिबात गरज नाही. त्यामुळेच की काय “डॉ. भगवान पवारांची 14 वर्षे पुणे सर्कलमध्ये फुगडी” सुरू आहे. मात्र पुणे सर्कलमध्ये केलेल्या कष्टाचे फळ गोळा करण्यासाठी यंत्रणा विकसित झाल्यामुळे त्यांना पुणे सर्कल सुटत नाही का ? असा प्रश्न आरोग्य विभागात चर्चिला जात आहे.
हे ही वाचा तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…
डॉ. भगवान पवार यांची पुणे सर्कलमधील कामाची तळमळ “सत्ताकारण”च्या लक्षात आली. त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी “सत्ताकारण”कडून 14 वर्षापासुनचा आढावा घेण्यात येत आहे. तर गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्ह्यात आरोग्य सेवा एकदम उत्तम, परंतु पुणे आणि सातारा हे दोन जिल्हे आरोग्य सेवेत खुपच मागास, अतिदुर्गम आणि प्राथमिक सोयी-सुविधांपासुन खुपच दूर. त्यामुळे येथे सक्षम अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची/आरोग्य अधिकाऱ्यांची गरज पूर्वीपासुनच होती. परंतु महाराष्ट्र शासनाकडील सार्वजनिक आरोग्य विभागात सक्षम असा अधिकारी कधी भरतीच झाला नाही. मात्र कालांतराने डॉ. भगवान पवार यांच्या रूपाने ही उणिव दूर झाली. आणि येथील आरोग्य सेवा सक्षम बनवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस सेवा देण्यास सुरूवात केली. आणि हेच व्रत अद्यापही अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे ते सध्या पुणे उपसंचालक पदी (पदश्रेणी अवणत करून) कार्यरत आहेत. शासन देखील त्यांना पुणे सर्कल व्यतिरिक्त इतरत्र उत्तम सेवा बजावण्यासाठी संधी का देत नाही ? की डॉ. भगवान पवार यांना पुणे सर्कल सोडून इतरत्र हवामान मानवत नाही ? असा प्रश्न खुद्द आरोग्य विभागातूनच उपस्थित केला जात आहे.
डॉ. भगवान पवारांची पुणे सर्कलमधील 14 वर्षे पुढील प्रमाणे…
-
सातारा : जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., सातारा : 27/08/2009 ते 27/05/2013
-
पुणे : जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., पुणे : 06/07/2015 ते 04/08/2017
-
सातारा : जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., सातारा : 28/09/2017 ते 13/06/2019
-
पुणे : जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., पुणे : 24/10/2019 ते 13/03/2023
-
पुणे : मुख्य आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, पुणे : 13/03/2023 ते 06/09/2023
-
पुणे : मुख्य आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, पुणे : 20/10/2023 ते 21/05/2024
-
पुणे महानगरपालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी पदी असताना तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 22/05/2024 रोजी महिला लैंगिक छळाच्या तक्रारीच्या अनुषंगाने निलंबन केले होते. त्यानंतर त्यांना नाईलाजास्तव सहाय्यक संचालक (वैद्यकीय), मुंबई मंडळ, ठाणे येथे जावे लागले. मात्र त्यानंतर पुन्हा…
-
पुणे : उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे येथे 22 ऑगस्ट 2025 रोजी पासुन ते अद्याप पर्यंत आरोग्य सेवा सुरू…
भविष्यातील योजना :
-
जॉईंट डायरेक्टर, मलेरिया, पुणे…
-
संचालक – 2 , पुणे…
-
अतिरिक्त संचालक, पुणे…
-
सेवानिवृत्ती, पुणे…
-
त्यानंतर वाढीव 2 वर्षे सेवा, पुणे…
हे ही वाचा क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा
डॉ. राखी माने यांच्या चुकीच्या काढलेल्या ऑर्डरवर उप सचिव अनिरूध्द व्य. जेवळीकरांची “चुप्पी”
आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार




