सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागाचा अजब कारभार पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे. चक्क “आनंद केमिस्युटिक्स” “फार्मा” कंपनीला “लाँड्री” सेवा पुरवण्याचे टेंडर देण्यात आले आहे. यामध्ये कहर म्हणजे आरोग्य भवन मधील “खरेदी कक्षा”मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकारे 600 कोटींचे टेंडर सदरच्या कंपनीने मिळवले आहे. ज्यामध्ये संबंधीत कंपनीने खोटी, फसवी आणि अपूर्ण कादपत्रे सादर केली आहेत. ज्याला “खरेदी कक्षा”तील अधिकारी जबाबदार आहेत.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी Mechanical Laundry टेंडरची कागदपत्रे पाहिल्यास त्यांना सत्य दिसुन येईल की, “आनंद केमिस्युटिक्स” फार्मा कंपनीला “लाँड्री” सेवा का दिली ? “आनंद केमिस्युटिक्स”कडे लाँड्री सेवेचा परवाना आहे का ? “आनंद केमिस्युटिक्स”ला लाँड्री सेवेचा पूर्वीचा कोणता अनुभव आहे ? त्यासंबधीत त्यांच्याकडे “शॉप ॲक्ट लायसन्स” आहे का ? यांबंधीत कामगारांचे “पीएफ”ची कादपत्रे सादर केली आहेत का ? पूर्वी जिथे-जिथे “आनंद केमिस्युटिक्स”ने लाँड्री सेवा दिली आहे, त्या ठिकाणच्या त्यांना देण्यात आलेल्या वर्कऑर्डर आणि त्याच संस्थांची दिलेली अनुभव प्रमाणपत्रे खरी आहेत का ? या सर्वांची उत्तरे स्पष्ट स्वरूपात मिळणार आहेत. टक्केवारीच्या समोर खरेदी कक्षातील अधिकारी जर आरोग्य मंत्री यांची दिशाभुल करत असतील, त्यांना खोटी माहिती देत असतील, तर यापूर्वी झालेल्या प्रत्येक टेंडरमध्ये आरोग्य मंत्र्यांची किती फसवणुक झाली असेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच या टेंडरमध्ये सहभागी कंपन्या Tharu & Son’s-केरळ, Anand Chemiceutics-पुणे, Daksh Enterprises-नाशिक, khalatkar Construction Infra Pvt Ltd-नागपूर, BKNSSS-अमरावती, Sanmit Infra Ltd-मुंबई, M/s D. M. Enterprises-वाशी, नवी मुंबई, The Acetech Machinery Components India Pvt Ltd-तमीळनाडू, Bhagyavidhata Employment Pvt Ltd-नांदेड, राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादीत-पालघर, या सर्वांबरोबर मिळून खरेदी कक्षातील अधिकारी आणि “आनंद केमिस्युटिक्स”ने काय घोळ केला आहे ? ते ही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना लक्षात येईल.
हे ही वाचा Mechanical Laundry च्या नावाखाली कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर
डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी
डॉ. विजय कंदेवाड यांच्या आदेशाला डॉ. डोईफोडे, डॉ. शेगर यांच्याकडून केराची टोपली




