सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
डॉ. उमेश शिरोडकर यांच्या निलंबनामुळे खरेदी कक्षाचे सहसंचालक पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज होती. परिणामी खरेदी कक्षाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
हे ही वाचा “आनंद केमिस्युटिक्स” “फार्मा” कंपनीला “लाँड्री” सेवा पुरवण्याचे टेंडर
आरोग्यसेवा आयुक्तालयातील सहसंचालक (खरेदी कक्ष) डॉ. उमेश शिरोडकर यांच्यावर खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईचा ठपका ठेवत मे 2026 रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत डॉ. शिरोडकर यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना गंभीर त्रुटी केल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या या निलंबनामुळे सदरचे पद रिक्त होते. या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांचेकडे नुकताच सोपविण्यात आला आहे. उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मुळ पदाचे कामकाज सांभाळून सहसंचालक, आरोग्य सेवा (खरेदी), मुंबई या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळायचा आहे. सदरचे आदेश सहसंचालक राजेंद्र भालेराव (आरोग्य सेवा (प्रशासन), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई) यांनी जारी केले आहेत.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
Mechanical Laundry च्या नावाखाली कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर




