सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
“आनंद केमिस्युटिक्स”ला फक्त मेकॅनाईज्ड लॉन्ड्री सेवांचे PPP अंतर्गत टेंडर मिळाले आहे. मात्र त्यांनी “सार्वजनिक आरोग्य विभागा”ची खरेदी केल्याच्या आविर्भावात “आनंद केमिस्युटिक्स”कडून मेकॅनाईज्ड लॉन्ड्री सेवांच्या बिलांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लोगोचा गैरवापर केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे लोगो असलेले लेटरपॅड बनवले आहे. आणि त्यावर बिले ही सादर केली आहेत. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांनी देखील सदरच्या बनावट लेटरपॅडवर स्वतःची सही-शिक्के मारून त्याला दुजोरा देण्याचा प्रताप केला आहे. या सर्व गैरप्रकारामुळे शासनाची आणि जनतेची फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि खोटी शासकीय ओळख निर्माण केल्याने “आनंद केमिस्युटिक्स”वर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
“आनंद केमिस्युटिक्स”ने “सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व सेवा पुरवठादार, आनंद केमिस्युटिक्स आणि सुपरड्राय युटिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर मेकॅनाईज्ड लॉन्ड्री सेवेचा मासिक अहवाल” अशा मथळ्याखाली बनावट लेटरपॅड आणि त्या बनावट लेटरपॅडवर “सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन” आणि NHM (National Health Mission) चा लोगो वापरलेला आहे. तर त्याच्या बाजुला स्वतःच्या ANAND CHEMICEUTICS चा लोगो वापरलेला आहे.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर किंवा प्रधान सचिव निपुण विनायक यांनी “आनंद केमिस्युटिक्स”ला शासनाचे लोगो वापरण्याची परवानगी दिली आहे का ? असा प्रश्न सार्वजनिक आरोग्य विभागात चर्चिला जात आहे. खासगी कंपनी “आनंद केमिस्युटिक्स”ने शासनाचा लोगो, चिन्ह किंवा लेटरपॅड वापरून स्वतःला शासकीय संस्था असल्याचा आभास निर्माण केला आहे. त्यामुळे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याने “आनंद केमिस्युटिक्स”वर भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे किंवा त्यांचा वापर करणे, तसेच खोटी ओळख निर्माण करून शासनाची आणि नागरिकांची दिशाभूल करणे यासंबंधीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बेकायदेशीर लोगो आणि लेटरपॅड वापरणे तात्काळ बंद करण्याचे आदेश देऊन छापील साहित्य, कागदपत्रे आणि डिजिटल सामग्री जप्त करायला हवी.

हे ही वाचा Mechanical Laundry च्या नावाखाली कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर
“आनंद केमिस्युटिक्स” “फार्मा” कंपनीला “लाँड्री” सेवा पुरवण्याचे टेंडर
खरेदी कक्षाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे




