सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागातील खरेदी कक्षामार्फत “आनंद केमिस्युटिक्स”ला यांत्रिक वस्त्र धुलाईच टेंडर देण्यात आले आहे. टेंडर देताना संबंधीत कंत्राटदारास शासनाकडून रितसर अटी, शर्ती व करारनामा करण्यात आला आहे. परंतु “आनंद केमिस्युटिक्स”ने करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केल्याने त्यांचे टेंडर रद्द करावे तसेच यांत्रिक वस्त्र धुलाई सेवांची बिले थांबवावी, यासाठी प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह 5 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे “आनंद केमिस्युटिक्स”ला दिलेले टेंडर पुन्हा एखदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
पक्षकार शरद अहिरे यांनी ॲड. सचिन एन. पाटील यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह सचिव-2 ई. रविंद्रन, आयुक्त संजय काटकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक (खरेदी कक्ष) उमेश शिरोडकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीस मध्ये म्हटले आहे की, “आनंद केमिस्युटिक्स”ने शासनाच्या अटी-शर्तीनुसार ठरवून दिलेल्या वेळेत संपूर्ण कामकाज सुरू केले नाही. वस्त्र धुलाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले नाही, कर्मचारी स्टेट इन्शुऱन्स काढला नाही, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कपात केला नाही, तसेच ज्या ठिकाणी कामकाज सुरु करून देयके सादर केली आहेत, ती सर्व देयके नियमबाह्य व करारातील अटी व शर्तींचे भंग करणारी आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष कामकाज बंद असताना देखील खोटी देयके सादर केली आहेत, त्यामुळे “आनंद केमिस्युटिक्स”ला दिलेले टेंडर रद्द करण्यासाठी व यांत्रिक वस्त्र धुलाई सेवांची बिले थांबवण्यासाठी प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्यासह 5 जणांना 29 जुन 2026 रोजी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्याकडून “आनंद केमिस्युटिक्स”चा ठेका रद्द केला जाणार का ? बिले थांबवली जाणार का ? अशी चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.

हे ही वाचा Mechanical Laundry च्या नावाखाली कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर
“आनंद केमिस्युटिक्स” “फार्मा” कंपनीला “लाँड्री” सेवा पुरवण्याचे टेंडर





