सत्ताकारण न्युज नेटकर्व : रणजित वाघमारे
ज्या “आनंद केमिस्युटिक्स”ने Mechanical Laundry च्या नावाखाली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून चक्क घरगुती Washing Machine चे उद्घाटन करवून घेतले, “आनंद केमिस्युटिक्स” ही फार्मा कंपनी असताना आणि कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांना “लाँड्री सेवा प्रदान” करण्याचे टेंडर नियमबाह्य पध्दतीने देण्यात आले, ज्या “आनंद केमिस्युटिक्स”ने कोट्यावधी रूपयांची खोटी बिले सादर केली, ज्या “आनंद केमिस्युटिक्स”मुळे सार्वजनिक आरोग्य विभागाला नोटीसा पाठवण्यात आल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाला बदनाम व्हावे लागले, अशा “आनंद केमिस्युटिक्स”ला ब्लॅक लिस्ट करून ठेका रद्दची कारवाई कधी ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला, सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पडला आहे. सध्या संबंधीत कंपनीची कोट्यावधी रूपयांची बिले अडवली आहेत, परंतु कारवाई मात्र गुलदस्त्यात आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांकडून अत्याधुनिक Mechanical Laundry च्या नावाखाली घरगुती Washing Machine चे उद्घाटन ?
सार्वजनिक आरोग्य विभागातील खरेदी कक्षातून “आनंद केमिस्युटिक्स”ला Mechanical Laundry चे 600 कोटींचे टेंडर गेल्या वर्षी देण्यात आले. ज्या कंपनीला लाँड्री सेवेचा अनुभव नाही, त्यांनी सदरची सेवा देण्याचा केविलवाना प्रयत्न केला. यामध्ये “आनंद केमिस्युटिक्स”ने चक्क आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा अपमान केला आहे. राज्यभरात लाँड्री सेवेचे थाटात उद्घाटन केले. परंतु त्या-त्या रूग्णालयात Mechanical Laundry बसवल्याची खोटी माहिती चक्क आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली. त्यांच्याकडून उद्घाटनही करवून घेण्यात आले. परंतु राज्यभरातील रूग्णालयातील वस्तुस्थिती मात्र वेगळीच. “आनंद केमिस्युटिक्स”कडून स्थानिक पातळीवर कित्येक ठिकाणी पूर्वीच्याच सेवा पुरवठाधारांकडून वस्त्रे लाँड्री करवून घेतली जात आहेत. त्यासाठी अटी-शर्तीमध्ये वर्षभरासाठी सुट देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही पुरवठा आदेशानुसार राज्यातील 593 सरकारी आरोग्य संस्थांमध्ये सदरची सेवा विस्कळीत आहे. 90 टक्के काम बोगस सुरू आहे. खोटी व दुप्पट बिले सादर करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे Mechanical Laundry चा राज्यभरातील सावळा गोंधळ थांबवण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाची बदनामी थांबवण्यासाठी “आनंद केमिस्युटिक्स”ला ब्लॅक लिस्ट करून ठेका रद्दची कारवाई कधी ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोटीस देऊनही औषध निर्माण अधिकारी पल्लवी पाटील गैरहजर
खरेदी कक्षाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडे
डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय पाहणी




