सत्ताकारण न्युज नेटवर्क : रणजित वाघमारे
अनेक पदे रिक्त आहेत, मी काम कसे करू ? अधिकारी-कर्मचारी कार्यालयात नसतात, मी काम कोणाला सांगू ? मला अधिकारच नाहीत, मी काय करू ? अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळेत काम केले नाही-द्या दम, कार्यालयातील गोष्टी पत्रकारांना कळाल्या, मी पोलिसाचा मुलगा-तुम्हाला बघुन घेईन, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या, सीईओ यांनी एखादी माहिती विचारली, तर दर वेळेस “मी नविन आहे…” हे नेहमीचेच उत्तर, सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागांच्या प्रश्नांवर चुप्पी, प्रत्येक गोष्टीसाठी काढा नोटीस, कोणत्या गोष्टीसाठी नोटीसा बजावण्यात याव्यात ? याचे ही नाही तत्त्वज्ञान… तर अशा पध्दतीने डॉ. सतीश कोपुरवाड यांचे कामकाज सुरू असुन त्यांना आरोग्य विभाग डोईजड झाला असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे सोलापूरला सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची गरज आहेच. तसेच त्यांचा ज्येष्ठता यादीत 155 वा क्रमांक, अन अनुभवाची कमतरता असतानाही ते “जिल्हा आरोग्य अधिकारी” पदी विराजमान झाल्याने त्यांची फसगत होत आहे का ? असा प्रश्न संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागात आनंदाने चर्चिला जात आहे.
हे ही वाचा DHO डॉ. कोपरुवाड यांच्याकडून पुरूष अधिकाऱ्यांना कोपरखळ्या, महिला अधिकाऱ्यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर
जि. प. आरोग्य विभागात यापूर्वी अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याच परिस्थितीत, आहे त्या उपलब्ध मनुष्यबळावर कामकाज पाहिले. परंतु त्यांनी कधी तक्रारी केल्या नाहीत. परंतु सध्या डॉ. सतीश कोपुरवाड यांच्याबाबत उलट चित्र दिसुन येत आहे. परिणामी आरोग्य विभागाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केंदार-सावंत आणि सर्व सदस्यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून डॉ. सतीश कोपुरवाड यांना शासनाकडे परत पाठवण्याची गरज आहे. तर त्यांच्या ठिकाणी सक्षम आणि अनुभवी अशा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणुक करणे गरज आहे.
सेवा शुल्काच्या आडून शासनाची 3 वर्षात 24 कोटींहून अधिकची होणार नाहक लुट




