सार्वजनिक आरोग्य विभागातील खरेदी कक्षामार्फत सुरू असलेल्या मनुष्यबळ टेंडर प्रक्रीयेतील घोळ आता सर्वांसमोर आला आहे. या निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. GEM Portal वरील निविदा प्रक्रियेत सहभागी 255 कंपन्यामधून सुमारे 45 हून अधिक कंपन्यांनी Shortfall/Presentation संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचे सांगितले. मात्र 45 हून अधिक कंपन्यांनी Shortfall कागदपत्रे सादर करूनही त्यांची तपासणी न करता अपात्र केल्याचा आरोप यातील कंपन्यांनी केला आहे. GEM Portal वरील प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे व Shortfall पूर्ण करूनही त्यांची कागदपत्रे तपासण्याची योग्य संधी न देता त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सर्व सहभागी कंपन्यांना समान संधी आणि समान निकष का लागू करण्यात आले नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होत असुन “टेंडर मॅनेज”चा “हायव्होल्टेज ड्रामा” सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात सुरू आहे.
Historical Documents तपासणीबाबतही प्रश्न
आरोग्य विभागाच्या खरेदी प्रक्रियेत यापूर्वी झालेल्या विविध निविदांमध्ये एखाद्या एजन्सीची Historical Documents संदर्भातील माहिती अपूर्ण, अस्पष्ट किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित निविदादाराला नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकरणात प्रथमच काही कंपन्यांना अशी संधी न देता अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे, काही कंपन्यांना पात्र ठरविताना त्यांच्या मूळ कागदपत्रांची आणि सादर केलेल्या प्रेझेंटेशनची सखोल तपासणी झाली का ? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
Smart Services Pvt Ltd आणि Crystal Integrated Services Ltd यांच्या पात्रतेवर प्रश्न…
Smart Services Pvt Ltd आणि Crystal Integrated Services Ltd या कंपन्यांना पात्र ठरविताना त्यांच्या मूळ कागदपत्रांची, Historical Documents ची तसेच इतर पात्रता निकषांची तपासणी कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याची माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे. विशेषतः एका बाजूला अनेक कंपन्यांनी Shortfall कागदपत्रे सादर करूनही त्यांना अपात्र ठरविले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला काही कंपन्यांना पात्र ठरविताना समान निकष वापरण्यात आले का ? याचे स्पष्टीकरण आवश्यक आहे.
BVG कंपनीच्या पात्रतेबाबतही पारदर्शकतेची मागणी…
देशातील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या BVG कंपनीला पात्र ठरविण्याच्या प्रक्रियेबाबतही संबंधित निविदा प्रक्रियेत सहभागी घटकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. BVG सह सर्व पात्र कंपन्यांची पात्रता तपासताना GEM निविदेतील अटी, Historical Documents, अनुभव, आर्थिक क्षमता, मनुष्यबळाची क्षमता, सादर केलेली कागदपत्रे आणि Presentation यांची समान पद्धतीने छाननी करण्यात आली का ? याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. तसेच “एकाच निविदेत काही कंपन्यांना Shortfall कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळत असेल, तर इतर कंपन्यांना समान संधी का मिळाली नाही ? आणि पात्र ठरविण्यात आलेल्या कंपन्यांची मूळ कागदपत्रे व Presentation नेमक्या कोणत्या निकषांवर त्या अधिकाऱ्याने तपासले आहेत ?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आरोग्यमंत्र्यांकडून स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी…
या संपूर्ण प्रकरणात GEM Portal वरील निविदा प्रक्रियेचे नियम, निविदेतील अटी आणि प्रत्यक्षात अवलंबलेली प्रक्रिया यांची स्वतंत्रपणे तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच Shortfall सादर केलेल्या सर्व कंपन्यांची कागदपत्रे प्रत्यक्ष तपासण्यात आली का ? कंपन्यांना समान संधी देण्यात आली का ? Presentation ची प्रत्यक्ष तपासणी झाली का ? Historical Documents बाबत सर्व कंपन्यांसाठी समान निकष वापरण्यात आले का ? पात्र व अपात्र कंपन्यांची गुणांकन/तपासणी प्रक्रिया पारदर्शक होती का ? संपूर्ण प्रक्रियेची अधिकृत नोंद व तपासणी अहवाल उपलब्ध आहे का ? आणि पात्र ठरविण्यात आलेल्या कंपन्यांची मूळ कागदपत्रे कोणत्या अधिकाऱ्यांनी तपासली ? याची आरोग्य मंत्र्यांकडून स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी संबंधीत सर्व अपात्र कंपन्यांकडून होत आहे. या अधिकाऱ्यांकडून निविदा प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन, पक्षपात, कागदपत्रांची योग्य तपासणी न करणे किंवा काही कंपन्यांना अनुचित फायदा देणे असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची तातडीने स्वतंत्र चौकशी करून खरेदी कक्षातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी होत आहे.