सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
सहसंचालक, आरोग्य सेवा, हिवताप-हत्तीरोग-जलजन्यरोग पुणे-6 या कार्यालयाने 2023 मध्ये 650 पदांची भरती प्रक्रीया राबविली. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पॅरामेडिकल नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही सहसंचालक कार्यालयातील निवड समितीने अनेक उमेदवारांना नियमबाह्य पध्दतीने नियुक्त्या देत बोगस भरती केली. त्यामुळे बोगस “प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भरती”मधील अधिकाऱ्यांचे निलंबन करून फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी लेखी तक्रारीव्दारे मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे शरत शेट्टी यांनी केली आहे.
हे ही वाचा बोगस भरतीतील उमेदवारांना सहसंचालक डॉ. संदीप सांगळेंचे पाठबळ
या बोगस भरतीमध्ये निवड समितीने पात्र ठरवलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र परावैद्यकीय परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही. त्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात आली नाही. मात्र तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण 8 सर्कलमधून या बोगस भरतीमधील सध्या जवळपास 39 जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होण्याआगोदर सहसंचालक कार्यालयाने फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम केले. कोणाचीही सेवा समाप्त केली नाही. तसेच याअनुषंगाने मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांनी ज्या उमेदवारांकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल कडिल नोंदणी प्रमाणपत्र नाही, असे प्रकरण खारिज केले आहे. त्यामुळे नियमबाह्य पध्दतीने बोगस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदावरील चुकीच्या नेमणुका झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तत्काळ समाप्त करणे आवश्यक आहे. या सर्व बोगस भरती प्रक्रीयेला निवड समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सर्व सदस्य जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी लेखी तक्रारीव्दारे मागणी शरत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
(टीप : या बोगस भरती प्रक्रीयेतील निवड समितीचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्य यांची नावे वाचा उद्याच्या “सत्ताकारण”मध्ये…)
हे ही वाचा लातुर सर्कलच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची होणार चौकशी
मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे




