सत्ताकारण न्युज नेटवर्क : मुंबई
येथे आरोग्यसेवा आयुक्तालयात बाह्यस्रोतांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा, रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सिटी स्कॅन, एमआरआय, उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार व स्वच्छता आदी सेवांचा आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला. यावेळी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना आरोग्य विभागात बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि रुग्णांचे समाधान याला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सुचना दिल्या.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन, 3 रा मजला येथे दुपारी 2 वाजता आऊटसोर्सिंग सेवा बाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रधान सचिव-1 डॉ. निपुण विनायक, सचिव-2 ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ही वाचा मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे
यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य सेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सेवांची नियमित तपासणी करून अहवाल सादर करावा, ‘स्टार रेटिंग प्रणाली’द्वारे वैद्यकीय सेवा, मनुष्यबळाची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना सकस व आरोग्यदायी आहार उपलब्ध करून देण्यासोबतच जनआरोग्य समित्या प्रभावीपणे कार्यान्वित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या उपक्रमांचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचा शासनाचा संकल्प आहे. प्रत्येक रुग्ण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. दर्जेदार उपचार, स्वच्छ वातावरण, पारदर्शक व्यवस्था आणि आपुलकीची सेवा, हीच आमची प्राथमिकता असल्याचे यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक व वैद्यकीय अधीक्षक सहभागी झाले होते.
हे ही वाचा अखेर डॉ. राजेंद्र रूपनवर यांची प्राणज्योत मालवली
45 हून अधिक कंपन्यांनी Shortfall कागदपत्रे सादर करूनही त्यांची तपासणी न करता अपात्र केल्याचा आरोप




