सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
वेळोवेळी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या मनीष सुरवसे यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध मान्यवर, सामाजिक संस्था आणि अधिकारी वर्गातून अभिनंदन केले जात आहे.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार निवास, नागपूर येथे 23 ऑगस्ट 2026 रोजी झाली. यावेळी मनीष सुरवसे यांची जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी RTO कार्यालयातील कर्मचारी मनीष सुरवसे यांची जिल्हाध्यक्ष पदी परत एकदा निवड झाल्याबद्दल सर्व शाखा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महासंघाचे सरचिटणीस अरविंद जेटीथोर, संघटक लक्ष्मण गायकवाड, कोषाध्यक्ष विजयकुमार लोंढे, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रशांत सुरे, प्रशांत भडकुंबे, सुधाकर राजगुरू, इंजेवाड, जलसंपदा शाखेचे अध्यक्ष शरण अहिवळे, श्री. टकले, शशिकांत शिंदे, आयटीआयचे लोहार, विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष रविराज शिंदे, डॉ. शिरीष बंडगर, रवींद्र हिप्परगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा मनुष्यबळ टेंडरमधील अतिरिक्त 24 कोटींची लुट थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी पुढाकार घेणे गरजेचे




