सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
मंद्रुप पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी कर्तव्यात कसुर करून बेकायदेशीर कामकाज केले आहे, असा आरोप करत त्यांच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी आज (29 ऑक्टोबर 2026) सकाळी 11 वाजल्यापासुन जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले.
राष्ट्रीय छावा संघटना, सोलापूरच्यावतीने राष्ट्रीय छावा संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांनी PI शंकर पटवारी यांच्या बेकायदेशीर कामाकाजाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी त्यांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात जमा असलेली बेवारस मोटारसायकल (MH13BX9548) आणि पोलिस ठाण्यातील शासकीय CCTNS यंत्रणेशी संबंधीत बॅटरी कथितरित्या अनधिकृतपणे बाहेर नेणे, त्यांचा वापर करणे, परत आणून ठेवणे, संबंधीत अभिलेखांमध्ये फेरफार किंवा अनियमितता झाल्याची शक्यता आणि या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांची भुमिका तपासुन दोषींविरूध्द कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये PI पटवारी यांच्याबरोबर संबंधीत पोलिस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ मारूती शेजाळ, शरणप्पा कांबळे, सुनील कोळी, प्रकाश जुकने उर्फ शाक्या आदी कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईची माणगी केली आहे.
यावेळी कार्याध्यक्ष संजय पारवे, उत्तर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील, शेखर फंड, शिरीष जगदाळे, सागर माने, विकास घंटे, बालाजी खांडेकर, संजय गायकवाड, विकास पाटील, आशिष चव्हाण, शहाजी चव्हाण, सागर अंबुळे, प्रेम पाटील, सोमनाथ पाटील, अमोघसिद्ध पाटील,नागेश घोरपडे, गजानन पवार, मारुती सावंत, बबलू घाडगे, सतीश चिंचोळे, रामजी इंगळे, मल्लिकार्जुन तलवार, सिद्ध इंगळे, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर पवार, नितीन चव्हाण, विशाल वाघमारे, साहिल निगवान, सोमा जाधव, माऊली सुरवसे, नागेश घोरपडे, गजानन पवार, मारुती सावंत, बबलू घाडगे, सतीश चिंचोळे, रामजी इंगळे, मल्लिकार्जुन तलवार, सिद्ध इंगळे, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर पवार, नितीन चव्हाण, विशाल वाघमारे, साहिल निगवान, सोमा जाधव, माऊली सुरवसे यांसह राष्ट्रीय छावा संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छावा संघटनेचे गणेश मोरे यांची सविस्तर लेखी तक्रार… Gmail – मंद्रूप पोलीस स्टेश… (9)
हे ही वाचा “बोगस प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी” भरतीतील अपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवा तत्काळ समाप्त करा
उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड पदमुक्त, उपसंचालक डॉ. भगवान पवारांना मात्र अभय




